कारंजा :-
कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयात आगळयावेगळया पद्धतीच्या बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
बोर म्हटलं की प्रत्येक आबाल वृद्धांच्या जिव्हाळ्याचा विषय.हिवाळ्याच्या दिवसात चवीने खाल्ले जाणारे फळ म्हणून बोराकडे पाहल्या जाते.मात्र वृक्षतोडीमुळे अनेक बोरांच्या जाती नष्ट होत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावरील बोरी सुद्धा आता झपाट्याने कमी होताना दिसत आहेत.जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव व वनराई या संस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक प्रा.सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात कु.नीता तोडकर,पर्यवेक्षक गोपाल खाडे व दिपाली खोडके यांनी बोर महोत्सवाचे आयोजन विद्यालयात केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या बोराची मांडणी विद्यालयात केली होती.यावेळी बोराची चटणी,बोराचा मुरब्बा,बोराचे बोरकुट बोराचे सरबत या पदार्थांची रेलचेल होती.गावरान बोरं ही दुर्मिळ जनुकीय ठेवा आहेत.वाढते शहरीकरण, बांधकाम,शेती यामुळे ही अस्सल गावरान बोरांची झाडं तोडली जात आहेत.गावरान बोरांची चव आणि त्यातील पोषणमूल्य हे हायब्रीड आणि संकरीत बोरांच्या तुलनेत जास्तीचे असतात.आपले व आपल्या परीसंस्थे तील पाखरं,खारूताई, माकडं, अस्वल,कोल्हा यांचे अन्न म्हणून गावरान बोरांचे विशेष महत्व आहे.ही बोरं टिकली पाहिजेत त्यासाठी वनराईच्या विद्यालयाच्या माध्यमातून या बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.बोर महोत्सवाच्या माध्यमातून बोरं,बोरांची झाडं,बोरं खाल्याच्या आठवणी,बोरांच्या पोषण मुल्य विद्यार्थ्यांनी एकमेकांना सांगितल्या.बोर महोत्सवात खाल्लेल्या बोरांच्या बिया जतन करून येत्या पावसाळ्यात काही बिया शाळेच्या रोपवाटिकेत रुजवून त्यांची रोपे तयार करण्यात येणार आहेत.ती रोपे परिसरात वाटली व लावल्या जाणार आहेत.

बोर महोत्सवाच्या माध्यमातून बोराचे झाड आहे ते ठिकाण,बोरांची चव,झाडाचे अंदाजे वय, बोरांमधील गराचे प्रमाण, झाडांची उंची,बोरं विकली जातात का?,खोडाचा घेर,झाड मालकाचे नाव,बोरांचा आकार याविषयीचा अभ्यास विद्यार्थी करणार आहेत.
वैष्णवी धामोरे, प्रिया सोनवाने,राधा निघोट,खुशी भजभुजे,योगेश लांजेवार,ओम धामोरे,समिक्षा जोगी व धनश्री चौके यावर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची बोरं बोर महोत्सवात आणली होती.दिव्या परते,अक्सा शहा,आयशा मेमन,श्रावणी ठाकरे,अनन्या ठाकरे,खुशी हळदे व पूर्वी ठाकरे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे बोराचे लोणचे,बोराचा मुरब्बा,बोराची चटणी, बोरांचे बोरकुट असे बोरांचे विविध पदार्थ बनवून आणले होते. बोरांचा आणि बोरांच्या विविध पदार्थांचा आस्वाद शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतला.
बोर महोत्सवच्या यशस्वीतेकरता विद्यार्थी व शिक्षक यांनी आता परिश्रम घेतले
आपल्या प्रतिक्रिया द्या....