कारंजा (लाड) : चालू आठवड्यात झालेल्या तुफान अशा अवकाळी पाऊसाने शेकडो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.त्यामुळे शेतकऱ्यानी वेळेवर संबधीत तालुका कृषी अधिकारी तथा तहसिलदार यांचेकडे तक्रार करून संबधित कृषी अधिकारी आणि मंडल आधिकारी तसेच संबधीत तलाठी (पटवारी) यांचेकडून शेती पिकाचे पंचनामे करून घ्यावेत. आपली तक्रार जे कोणी दाखल करून घेणार नाहीत किंवा आपल्या नुकसानग्रस्त शेती पिकाचे पंचनामे न झाल्यास त्याची जिल्हाधिकारी व आमदार महोदयाकडे रितसर तक्रार नोंदवावी. माहिती अधिकार कायद्याचा वापर करून वेळोवेळी संबधितांना नुकसान भरपाई बाबत जाब विचारावा. व आपल्या हक्काची सरसकट नुकसान भरपाई आणि सरसकट पिकविम्याची रक्कम मिळवावी. असे कळविण्यात आले आहे.