नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कानपा येथे लक्सझरी व चार चाकी वाहणाच्या धडकेत सहा ठार झाल्याची घटना तीनच्या सुमारास घडली असून मृतकांना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
यात लहान मुलगी नागपूर येथे नेत असताना मरण पावली. नागपूर येथील सर्व नातेवाईक किन्ही येथे जात असताना लक्सझरी ऐ आर बी, एम एच ३३टी २६७७ही गडचिरोली वरून नागपूर येथे जात होती तर नागपूर वरून अल्टो मारुती सुझुकी एम एच ४९बी आर २२४२ चे चालकाने हय गयीने वाहन चालवून अपघात घडली असल्याचे समजते. यात नागपूर येथील आपसी नातेवाईक किन्ही येथील मुलाला भेट आणि पत्नीची भेट घेण्यासाठी निघाले असता वाटेतच असा दुर्दैवी प्रसंग घडला यामध्ये रोहन विजय राऊत, वय ३०, रुकषीकेश विजय राऊत वय २०, गीता विजय राऊत वय ४५, सुनीता रुपेश फेंडर वय ४०, यामिनी रुपेश फेंडर वय ९, प्रभा सोनवणे वय ३० ठार लाखनी हे सर्व अपघातास बळी पडले. नागभीड पोलीस स्टेशनयेथे माहिती मिळताच ठाणेदार घारे साहेब पूर्ण चमू सहित घटना स्थळी पोहचून मदत करीत सर्वाना ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे प्रयत्न केले. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी ठोसरे यांनी दवाखाना नागभीड येथे ठाणेदार घारे साहेब यांचेशी चर्चा करून तपास करीत आहे. वृत्त लिहेपर्यंत मर्ग दाखल करण्यात आलेला नाही. लक्सझरी वाहन चालकावर गुन्हा दाखल करून वाहन जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक साखरे करीत आहे.