चंद्रपूर : भावाला भेटुन परत जात असताना पाण्याच्या टाकीवरून उडी घेवुन एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 21 जुन) रोजी सकाळी 6 वाजता दरमयान घडली. विनोद कवडु निकुरे वय 45 वर्षे, रा. मूल असे उडी घेवुन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
येथील विनोद निकुरे हा सकाळी भावाला भेटण्यासाठी आला होता, तो भेटुन परत जात असताना पंचायत समितीच्या मागील भागात असलेल्या मोजेस लेऑऊट मधील नगर पालीकेच्या टाकीवर उडी घेत आत्महत्या केली, आत्महत्या करण्याचे नेमके कारण अजुन तरी स्पष्ट झाले नाही. घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. मृत्तकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे.