वाशिम : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात महायुतीने सलग पाच वेळ विजयाची सुवर्णाक्षरात नोंद झालेल्या, विदर्भकन्या "शिवसेनेची वाघीन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, महाराष्ट्रातील एकमेव विद्यमान खासदार भावनाताई गवळी यांना डावलून उमेद्वाराची शोधाशोध केली अखेर मतदार संघात महायुतीमध्ये त्यांना लायक असलेली एकही व्यक्ती न मिळाल्याने उमेद्वारी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी, मराठवाड्यातील हिंगोली येथील विद्यमान खासदाराच्या पत्नी आणि नांदेडच्या यशस्वी सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत महल्ले पाटील यांना शिंदे सेनेची उमेद्वारी जाहीर करीत महायुतीचा उमेद्वार म्हणून घोषीत केले. याबाबत महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेने मतदार संघाचा दौरा करीत मतदारांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातील मतदारांना महायुतीचा हा निर्णय रुचला असल्याचे दिसत नाही.याबाबत प्रतिक्रिया घेतल्या असता शेकडो तरुण सुशिक्षित बेरोजगार तथा शेतकऱ्यांनी तर सांगितले की, "महायुती आता आमच्या मतदार संघाला मराठवाड्याचे गुलाम करणार की काय ? तसेच एकदा का हा मतदार संघ मराठवाड्याचे ताब्यात गेलाच तर मात्र भविष्यात काहीही खरे नाही. किती वर्ष मतदार संघ परत मिळणार नाही हे भविष्यात सांगता येणार नाही." अशा प्रतिक्रिया दिल्या.तसेच महायुतीच्या उमेदवार राजश्रीताई पाटील ह्यांचे माहेर हे यवतमाळ जिल्हातील नेर तालुक्यातील सारंगपूर येथील असल्याचे सांगण्यात येत असले तरी वाशिम जिल्हया करीता मात्र निश्चितच त्या अपरिचित किंवा अनोळखी आहेत. त्यामुळे त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचेच दि 10 एप्रिल 2024 रोजी झालेल्या त्यांच्या प्रचार सभेतील उपस्थिती वरून दिसून आले. त्यामुळे अखेर त्यांच्या प्रचारा करीता, आपल्या पाया खालील वाळू घसरल्यामुळे घाबरलेल्या शिंदे सेनेने, राष्ट्रिय काँग्रेसचे माजी खासदार तथा दोन चार दिवसांपूर्वी शिंदेसेने मध्ये प्रवेश केलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते स्टार प्रचारक गोविंदा अरुण आहुजा यांना शनिवार दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी मतदार संघात प्रचारार्थ बोलवीले आहे.मात्र मतदार संघातील, अस्मानी आणि सुलतानी संकटाने घायाळ असलेला शेतकरी राजा, सुशिक्षित बेरोजगार युवा वर्ग, कामगार आणि मजूरीचे काम करणाऱ्या तळागाळातील महिला मंडळी इत्यादी मतदारांवर काँग्रेसला बेईमान होणाऱ्या सिने अभिनेता गोविंदा यांच्या धावत्या भेटीचा परिणाम होईल असे अजिबातच वाटत नाही. कारण दारिद्र ,बेरोजगारी, अस्मानी संकटे व महागाईने होरपळणाऱ्या मतदारावर किंवा गोविंदाच्या चाहत्यावर, सिनेसृष्टीतील त्याच्या प्रचाराचा काहीच उपयोग होणार नाही हे वास्तवातील चित्र आहे. असे वृत्त मिळाल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळविले.