अकोला - लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचा ७ वा मासिक विचारमंथन मेळावा व पत्रकारांसाठी कायदेविषयक कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.अकोल्यात जठारपेठेतील जैन रेस्ट्रोमध्ये संघटनेचे केंन्द्रीय मागदर्शक तथा अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॕड.राजेश जाधव यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॕड प्रविण तायडे व अॕड.राजेश कराळे हे सुध्दा प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.यावेळी केन्द्रीय मार्गदर्शक व साहित्त्य संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे,जेष्ठ समाजसेवक प्रा.डॉ.संतोष हूशे,प्रा.राजाभाऊ देशमुख, संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,सचिव राजेन्द्र देशमुख,उपाध्यक्ष प्रदिप खाडे,कोषाध्यक्ष किशोर मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी अॕड.जाधव,अॕड.कराळे व अॕड.तायडे यांनी वृत्तप्रसिध्दीपूर्व घ्यावयाची दक्षता आणि प्रसिध्दीपश्चात येणाऱ्या समस्यांबाबत मार्गदर्शन करून लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकार आणि हक्कांचा वापर कसा करावा याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले,तथा नंतर आलेल्या प्रश्नांची यथोचित स्पष्टीकरणे विचारमंथनातून दिली.
अॕड.प्रविण तायडे यावेळी यांनी उपलब्ध करून दिलेल्या शासकीय कर्तव्यातील विलंबास अधिनियम २००५ कलम ०८ नुसार प्रतिबंध करणाऱ्या नागरीकांच्या सनदेची प्रत अध्यक्षांच्या सूपूर्द केली.त्याच्या प्रती काढून अद्यायावत माहितीसाठी पत्रकार सभासदांना वितरीत करून ग्रूपवरसुध्दा टाकण्यात येणार असल्याचे,त्याचप्रमाणे आगामी काळात नैसर्गिक व पत्रकार आपत्ती व्यवस्थापनाचीही कार्यशाळा सर्व पत्रकारांसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संजय देशमुख यांनी दिली.
यावेळी सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व समाजोध्दारक संत गाडगे बाबा या दोन सामाजिक महापुरूषांना हारार्पण करून वंदन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रा.डॉ.मंदार कृष्णराव देशमुख,निंबेकर,यांचा तत्वज्ञान विषयातील डॉक्टरेटबध्दल,मा.पुष्पराजी गावंडे यांचा गाडगे बाबा सेवा समितीकडून प्राप्त सन्मान सत्काराबाबत,तर याच कार्यक्रमात मा.प्रा.डॉ.संतोषजी हूशे यांना प्राप्त चैतन्न्यवृक्ष उपाधीबाबत तर मा.सिध्देश्वर देशमुख याची द विदर्भ प्रिमिअर हाऊसिंग सोसायटीवरील नियुक्तीबाबत अभिनंदनपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित होते.
या कार्यक्रमास सिध्देश्वर देशमुख,विजयराव देशमुख,सौ.जया भारती इंगोले,नंदकिशोर चौबे,अंबादास तल्हार,संदिप देशमुख,सागर लोडम,मंगेश चऱ्हाटे,सौ.दिपाली बाहेकर,दिलीप नवले,दिपक शर्मा,रवि पाटणे,सतिश देशमुख,शिलवंत खंडारे,व ईतर पत्रकार मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रम संचलन संजय देशमुख यांनी तर संघटनेचेकेन्द्रीय मार्गदर्शक प्रा.डॉ.संतोष हूशे यांनी पत्रकार कसा असावा आणि सभासदत्वासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या निकषांबाबत मनोगतातून माहिती देऊन आभारप्रदर्शन केले.