धार्मिकदृष्ट्या या विवाह सोहळ्याचे खूप महत्त्व असून या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम काल सकाळपासून पंढरपूर परिसरात सुरु झाली.
वसंतपंचमी म्हणजे निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत बहरते. वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळा पार पडतो. देवाच्या या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात. त्यानुसार आज हा विवाह सोहळा पार पडला.
वसंत पंचमीला होणारा श्री विठ्ठल रुक्मिणीचा हा विवाह सोहळा दरवर्षी राजेशाही पद्धतीने पार पडतो.