स्थानिक गडचिरोली पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने चंद्रपूर रस्त्यावरील एका वाहनाच्या शोरूमजवळ रात्री सापळा रचून ४०० नग देशी दारूच्या बॉटल जप्त केली. या कारवाईत पोलिसांनी २८ हजार रुपये किमतीची देशी दारू आणि ६५ हजार रुपये किमतीची एक दुचाकी असा एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुलबहार दिबू ठाकूर (२२, रा. गोकूळनगर) असे अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार ठाकूर हा दुचाकीने दारू चंद्रपूरवरुन शहातील गोकूलनगर येथे दारूची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली ठाण्यातील डीबी पथकाला मिळाला. माहितीच्या आधारे डीबी पथकाच्या चमूने चंद्रपूर मार्गावरील आयटीआय चौकात सापळा रचला. एमएच ३३ एएफ १८२८ क्रमांकाची दुचाकीवर येत असलेले युवक हा संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी सदर दुचाकीला थांबवून चौकशी केली. त्याच्याकडे जवळपास ४०० नग देशी दारूच्या बॉटल आढळून आल्या.
पोलिसांनी देशी दारू व दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुलबहार ठाकूर या तस्करास ताब्यात घेतले आहे. सदर कारवाई ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकातील धनंजय चौधरी, तुषार खोब्रागडे, योगेश कोडवते, वृषाली चव्हाण यांनी केले. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.