कारंजा-येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येेथिल बाबासाहेब धाबेकर विद्यालयात दिनांक 13 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अंतर्गत "तिरंगा रॅली" मुख्याध्यापक विजय भड यांच्या मार्गदर्शनात आयोजित करन्यात आली होती.
दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी संपूर्ण गावातुन तिरंगा रॅली काढण्यात आली, त्यामध्ये भारत मातेचे सेवक आम्ही तिरंग्याचे रक्षक आम्ही, देश की रक्षा कोण करेंगे कोण करेंगे हम करेंगे हम करेंगे,हर घर तिरंगा घर घर तिरंगा असे विविध देशभक्तीपर नारे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या देशभक्ती पर नारे व देशभक्तीपर गीताने संपूर्ण यावर्डी दुमदुमून गेली. यावेळी बहुतांश विद्यार्थ्या जवळ तिरंगा देण्यात आला होता. विद्यार्थी तिरंगा उंचावत विजयी विश्व तिरंगा प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा हे देशभक्ती गीत सूरात म्हणत होते. अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध असलेल्या तिरंगा रॅलीचे गावकऱ्यांनी कौतुक केले.
सदर तिरंगा रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, शिक्षक राजेश शेंडेकर,गोपाल काकड, अनिल हजारे, तर शिक्षकेत्तर कर्म. देविदास काळबांडे, भालचंद्र कवाणे, राजेश लिंगाटे, राजु लबडे, राजेंद्र ऊमाळे यांचे सह वर्ग 8, 9 & 10 चे विद्यार्थी उपस्थित होते.