अकोल्यातील ख्यातनाम वकील,माजी ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट, लोकस्वातंत्र्य पत्रकार संघाचे मार्गदर्शक सल्लागार पदाधिकारी अॕड.नितीनजी अग्रवाल यांची नागपूर येथे निगोशिएबल इन्स्ट्र्यूमेन्टल अॕक्टमधील १३८ च्या धनादेश अनादरण प्रकरणातील निवाड्यांसाठी विशेष न्यायाधिश म्हणून नियुक्ती झालेली आहे.
अॕड.अग्रवालजी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे आधारस्तंभ म्हणून सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय होते. मित्र परिवारातील कोणाचीही समस्या जाणून घेऊन त्यांना आपुलकीने विधायक विचारांनी कायदेशीर व सर्व प्रकारचे मार्गदर्शन करणे हा त्यांच्या स्वभावाचा विशेष पैलू आहे.
गेल्या दिड वर्षात अत्यंत तळमळीने कर्तव्य व बांधिलकीच्या भावनेतून पत्रकार महासंघासाठी दिलेले योगदान,वेळोवेळीची भावनिक साद आणि सर्वांगीण मार्गदर्शनातून दिलेले विधायक, नैतिक सहकार्य उल्लेखनिय राहिलेले आहे.ते अगोदर धुळे व आर्वी येथे ज्युडीशियल मॅजीस्ट्रेट म्हणून कार्यरत होते.परंतू उच्च श्रेणीतील सरळ नियुक्तीसाठी त्यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली होती.
त्यांना प्राप्त सन्मानजनक यशाबद्दल त्यांचे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक -अध्यक्ष संजय एम देशमुख आणि सर्व पदाधिकारी व मित्रमंडळीकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.