कारंजा:-
दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी कृषी विभाग कारंजा व प्रकल्प संचालक आत्मा यांचे संयुक विध्यमाने पंचायत समिती कारंजा येथे राणभाजी महोत्सवाचे आयोजन कृषी विभाग कारंजा व प्रकल्प संचालक आत्मा यांचे संयुक विध्यमाने पंचायत समिती कारंजा येथे राणभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सभापती पंचायत समिती कारंजा सौ रावीताताई विश्वनाथ रोकडे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी, संतोष चौधरी यांनी केले. माजी जि प सदस्य, शेतीचे गाढे अभ्यासक ,शेतकरी नेते गजानन भाऊ अमदाबादकर यांनी राणभाजी चे औषधी गुणधर्म व उपयोग या विषयी अवगत केले. गटविकास अधिकारी, शालीकराम पडघन यांनी रासायनिक भाजीपाला सेवन करण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामा बाबत मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी तसेच तालुका अध्यक्ष भा ज पा डॉ राजेश काळे यांनी पूर्वी च्या काळी आपण सेवन करत असलेल्या राणभाजी मुळे आपण कसे दुर्धर आजारांपासून सुरक्षित होतो हे समजावून सांगितले. विजय काळे सरपंच जयपूर तसेच जिल्हा युवा अध्यक्ष भा ज प यांनी राणभाजी महोत्सवा पुरतेच मर्यादित न राहता शेतकरी तसेच महिला बचतगट यांना कायमस्वरूपी राणभाजी विक्री केंद्र उपलब्द करून देण्याकरिता राज्य कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग यांना सूचित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत ढोकणे , कृषी पर्यवेक्षक कारंजा व अनुराधा राजुस्कर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सौ वनिता ताई देवरे सभापती समाजकल्याण, दत्ता पाटिल तुरक,, चंदुभाऊ डोईफोडे हे हजर होते. तसेच प स सदस्य प्रदीप देशमुख,देवानंद देवळे, अलका अंबरकर , मयूर मस्के, शुभम बोनके, दिनेश वाडेकर,व लहू चौव्हान , गट शिक्षणाधिकारी माने , कृषी विस्तार अधिकारी कोल्हे ई उपस्थित होते. आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी रवींद्र जटाळे यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....