महसुल विभागा मार्फत राज्यात दिनांक ०१ ऑगष्ट २०२५ रोजी महसुल दिन व दिनांक १ ते ७ ऑगष्ट, २०२५ या कालावधीत महसुल सप्ताह २०२५ साजरा करणे बाबत. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचे शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१६२/आस्था-०१ ई-१) दिनांक २९ जुलै २०२५ यांचे निर्देश प्राप्त झाले आहे.त्या नुसार कारंजा तालुक्यात या वर्षी महसुल दिना पासुन दिनांक ०१/०८/२०२५ ते ०७/०८/२०२५ या कालावधीत कारंजा तालुक्यात महसुल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचा तपशिल खालील प्रमाणे
१ ऑगस्ट रोजी महसुल दिन साजरा करणे व महसुल सप्ताह शुभारंभ महसुल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी/कर्मचारी पुस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभाथर्याना विविध प्रमाणपत्र वितरण समरंभ,
२ ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन २०११ पुर्वीपासुन रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकुल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करणेबाबत कार्यक्रम,३ ऑगस्ट रोजी पाणंद व शिवार रस्त्यांचे मोजमाप करून झाडे लावण्याची मोहीम राबवली जाणार आहे.४ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यवस्व अभियान प्रत्येक मंडळ निहाय राबवला जाईल,व ५ ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजनां डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदान वाटप करण.६ ऑगस्टला अतिक्रमण झालेल्या जमिनी निष्कासित करून व अतिक्रमण मुक्त करणे शर्तभंग झालेल्या शासन जमिनीबाबत,शासन धोरणानुसार (नियमाकुल करने शासन जमा करणे)त्याबाबत शासकीय निर्णय घेतला जाणार आहे. शेवटी ७ ऑगस्टला M-Sand धोरणांचे पुनरावलोकन,नविन कार्यपद्धतींचे अंमलबजावणी आणि महसूल सप्ताहाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे.या संपूर्ण सप्ताहादरम्यान कारंजा तालुक्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी केले आहे.