कारंजा(लाड) :शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी काळात सण उत्सव शांततेत पार पडावे याकरिता शांतता समितीची सभा दि.22 मार्च 2025 रोज शनिवारला सकाळी अकरा वाजता कारंजा (लाड) शहर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली.आगामी काळात सण उत्सव रमजान ईद गुढीपाडवा रामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती तसेच आंबेडकर जयंती आदी सन उत्सव शांततेत पार पाडावे याकरिता कारंजा (लाड) पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी तसेच कारंजा शहर पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या उपस्थितीत शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये आगामी सण उत्सव शांततेत पार पाडावे असे आव्हान करण्यात आले.तसेच सोशल मीडियावर कोणथीही आक्षेपाहे पोस्ट टाकून कोणत्याही जाती धर्माच्या लोकांच्या मनातील भावना दुखावल्या जाणार नाही.
याची दक्षता घ्यावी.व सोशल मीडियाचा वापर जपून करावा. यावर पोलिसांची करडी नजर असून काही समाजकंटकांनी यावर जर कायद्याची पायमल्ली केली तर त्यांची गय केल्या जाणार नाही.त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार याकरता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासन आपल्याच मदतीला धावेल.याकरिता पोलीस प्रशासनाला संपर्क करावे.असे आव्हान कर्तव्यदक्ष ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांनी कारंज्यातील जनतेला केले.तसेच यावेळी पत्रकार प्राध्यापक शेख सर पत्रकार समीर देशपांडे आदी शांतता समितीचे सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या शांतता समितीच्या सभेला प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया पत्रकार माजी नगराध्यक्ष संजय काकडे माजी उपाध्यक्ष जुम्मा भाई पप्पूवाले नगरसेवक वकील जाकीर शेख नगरसेवक नितीन गढवाले नगरसेवक प्रसन्न पळसकर पत्रकार अमोल पाटील अगम तसेच विश्वहिंदू परिषद बजरंग दलचे उपाध्यक्ष मंगेशजी कडेल दिलीप रोकडे किशोर उके मोहन पंजावांनी जहीर भाई आदी नगर सेवक, समाज सेवक बीसू भाई पैलवान मुस्लिम समाजाचे मौलवी साहेब व शांतता समितीचे सदस्य व पत्रकार आदी समाजसेवकांची उपस्थिती होती.या शांतता समितिच्या मिटींगचे व्यवस्थापन गुप्तचर विभागाचे उमेश चचाने यांनी केले.तर आभार प्रदर्शन ए.पी.आय.प्रशांत सुपनार यांनी केले.असे वृत्त विजय खंडार यांनी कळविले.