कारंजा : प्राप्त माहितीनुसार दिनांक 19 /10/ 2024 सकाळी साडेबारा वाजता वाजताच्या कारंजा ते अमरावती रोडवरील भिलखेडा जवळच्या स्वातंत्र्यविर सावरकर चौकात कंटेनर आणि खाजगी प्रवाशी बसची आपसात धडक होऊन त्यामध्ये पाच जण किरकोळ जखमी झाले. बसच्या मागच्या साईटला कंटेनर ने जोरदार धडक दिल्याने कारंजा ते अकोला जाणारी प्रवाशी बस दुभाजकावर चढली. त्यामुळे बसमधील प्रवाशांना किरकोळ मार लागला. या अपघातामध्ये आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती 108 चे चालक नंदकिशोर आरेकर यांनी तात्काळ श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली.त्यांनी तात्काळ संत गाडगेबाबा विचार मंचाच्या रुग्णवाहिकेचे शुभम खोंड समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक श्याम घोडेस्वार ग्रामपंचायत विळेगाव रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अमोल गोडवे वेदांत रुग्णवाहिकेचे शंकर रामटेके जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे अनिकेत भिलांडे यांना तात्काळ घटनास्थळी पाठविले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ उदय जाधव यांनी प्रथमोपचार केले. त्यावेळी मदतीसाठी कक्षसेवक राहुल तांबोले के न्यूज चे पत्रकार धनंजय राठोड मेस्को दिलीप लाड मंगेश टक श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख प्रियाताई महाजन 102 चे पायलट राजूभाऊ राठोड सागर गोगलिया त्यावेळी मदतीसाठी धावून आले होते. या अपघातामधील जखमीचे नावं रोहित यादव (वय 21 )रा मध्यप्रदेश ; अविनाश वरघट वय 34 ; धनास दादाराव डोंगरे वय 62 ; रा मोऱ्हळ
रामेश्वर लांजेवार रा मोऱ्हळ ; मोहम्मद अजमल वय 12 कारंजा ; मरीना फातिमा वय 12 कारंजा ; आचल संत्रे वय 22 रा सावनेर ; गौरी ठाकरे वय 20 रा सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर अशी असल्याचे कळते.