नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम रिसर्च सेंटरद्वारे आयोजित पुरस्कार समारंभ सोहळ्यात सर्वोत्कृष्ट रीसर्च कार्यासाठी डॉ.अविनाश रमेश चल्लेलवार यांना नामांकित डॉ. एपीजे अब्दुल कलाम रिसर्च एक्सेलेन्स अवार्ड २०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. अविनाश मुंबई विद्यापीठांतर्गत कार्यरत असतांना संशोधन कार्य सुरू होते सद्यास्थितीत सरदार वल्लभभाई पटेल मेमोरियल सोसायटी, अंतर्गत राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे गणित विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यांनी गणित विषयात पीएचडी,डी एस्सी, डाँ. डिव्हिनीटी अडवांन्स इंटेग्रल डॉक्टरेट असे डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेट डिग्री पूर्ण केलेले असून फेबोनासी नंबर ऍड गोल्डन रेशो, वेदिक मॅथ्स यावर संशोधन कार्य पूर्ण केलेले आहे. तसेच प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रकाशित करण्यात आलेले आहेत सोबतच यांना डॉक्टरेट फेलोशिप प्रदान करण्यात आलेली होती व विद्यारत्न रिसर्च अवार्ड २०२१ ने सुद्धा सन्मानित करण्यात आले होते, डॉ. अविनाश हे आयजेईआरऐई वर्ल्ड रीसर्च कौन्सिल आंतरराष्ट्रीय प्रमुख मंडळाचे सभासद असून रिसर्च कार्यासाठी कार्यरत आहेत.
चंद्रपूर व गडचिरोली येथील प्रभागात संशोधन कार्यासाठी चालना मिळावी व गणित संशोधन दृष्टिकोन तयार होऊन येथील विद्यार्थी संशोधन कार्यात पुढाकार घ्यावा यासाठी सीएआरपीएल झेड आय (रिसर्च झिरो टू इंनफिनिटी) नावाने नवीन संशोधन प्रकल्प सुरू केलेला आहे. उपरोक्त सर्व स्तरावर संशोधन कार्यरत असल्यामुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम रिसर्च सेंटर द्वारे रिसर्च एक्सेलेन्स अवार्ड २०२२ हा उच्च शैक्षणिक नामांकित पुरस्कार डॉ. अविनाश यांना देऊन गौरविण्यात आले आहे. सदर पुरस्कार समारंभात प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. राजेश रामदास एकेआरसी संशोधन पुरस्कार समिती प्रमुख, डॉ. रमेश चौधरी कुलगुरू व्यंकटेश्वर विद्यापीठ, डॉ. सीमा नेगी संस्थापक प्राचार्य/संचालक विश्वशाळा तसेच समाजसेविका, डॉ. विनायकराव पाटील माजी मंत्री, डॉ. सुधाकरराव आयकर आयुक्त, श्री सुधाकर संग्राम भालेराव बीजेपी वरिष्ठ नेता तसेच विविध शिक्षण आणि इतर क्षेत्रातील नामांकित मान्यवर उपस्थित होते.
सदर पुरस्कार प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव केल्याबद्दल डॉक्टर विजय आईचंवार अध्यक्ष सरदार पटेल मेमोरियल सोसायटी चंद्रपुर, श्री निनाद गड्डमवार उपाध्यक्ष सरदार पटेल मेमोरियल सोसायटी चंद्रपूर, डॉ.झेड जे खान प्राचार्य राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर तथा महाविद्यालय कर्मचारी ह्या सर्वांकडून अभिनंदन होत आहे. उपरोक्त यश प्राप्त करून गडचिरोली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविल्याने जिल्ह्याचा मान उंचावला असल्याचे जिल्हा वासीयाकडून गौरवोउद्गार केले जात आहे.