अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक , शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम संपूर्ण विश्वात राबवले जात आहेत . त्याचाच एक भाग म्हणून विश्व योग दिनानिमित्त 21 जून २०२३ रोजी सायं.६ वाजता दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या आंतरराष्ट्रीय मंचावर योग प्रशिक्षक श्रद्धा दळवी यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे . श्रद्धा दळवी ह्या दुबई येथे राहत असून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या योग प्रशिक्षक म्हणून त्या कार्यरत आहेत . श्रद्धा दळवी यांनी आपल्या दिव्यांगात्वावर मात करून आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक , रेकी ट्रेनर व मेडिटेशन गुरु म्हणून लौकिक प्राप्त केला आहे . दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांचे व्याख्यान दिव्यांग व सर्वसाधारण व्यक्तीसाठी खुले असून त्याकरिता संस्थेच्या हेल्पलाइन ०९४२३६५००९० या क्रमांकावर नोंदणी करावी . या व्याख्यानाचे प्रक्षेपण दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या फेसबुक ,इंस्टाग्राम व यूट्यूब चैनल वर लाईव्ह केले जाणार असल्याने या उपक्रमाचा लाभ संपूर्ण विश्वातील जनतेला होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे भारती शेंडे ,संजय तिडके ,अरविंद देव ,विजय कोरडे ,अनामिका देशपांडे ,संजय फोकमारे ,वंदना तेलंग ,शुभांगी मानकर ,तृप्ती भाटिया ,पूजा गुंटीवार ,दिपाली चिकटे ,अंकुश काळमेघ ,विशाल भोजने , नेहा पलन व अस्मिता मिश्रा यांनी दिली आहे .