ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा भुज ते एकारा रोड दरम्यान अवैधरीत्या गोवंश जनावरे वाहतुक होत असल्याचे खात्रीशिर खबरेवरून ब्रम्हपुरी पोलीसांनी नाकाबंदी करून अवैध जनावरांची वाहतुक होत असलेले दोन आयसर ट्रक वाहन ताब्यात घेवुन सर्व गोवंशाना गोरक्षण केंद्रात जमा केले. आरोपींविरोधात पोस्टे ब्रम्हपुरी येथे आणुन गुन्हा नोंद केला.
दि. २१/११/२०२२ रोजी रात्रो ०१/०० वा. ते ०६/०० वा. दरम्यान ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा भुज ते एकारा रोड दरम्यान दोन आयसर वाहनात अवैधरीत्या गोवंश जनावरांची वाहतुक होत असल्याचे खात्रीलायक माहीती वरून सदर रोडवर पोलीसांकडुन नाकाबंदी केली असता नाकाबंदी दरम्यान २ आयसर ट्रक क्रमांक MH 40 CD 4917 व MH 40 CD 4013 लागोपाठ आल्यावर त्या वाहनांना थांबवुन वाहनाची झडती घेतली असता दोन्ही वाहन मिळुन एकुण ५० गोवंश जनावरे कि. ५,००,०००/रू जनावरांसह ट्रक कि. २४,००,०००/रू असा एकुण २९,००,०००/ लाख रू/चा मुददेमाल आरोपींच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला. अवैधरीत्या वाहतुक करणा-या एकुण ६ आरोपींविरूध्द कलम ५(अ) (ब) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सहकलम ११(डी) (एफ) प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम, सहकलम ११९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम सहकलम ८३/१७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सर्व जनावरे गोविंद गोशाळा, हळदा ब्रम्हपुरी येथे दाखल करण्यात आलेले आहे.
सदरची कार्यवाही श्री मल्लिकार्जुन ईंगळे सा. उपविभागीय पोलीस अधिकारी मुल, अतिरीक्त कार्यभार ब्रम्हपुरी तसेच पोलीस निरिक्षक रोशन यादव पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुरेंद्र उपरे, पोउपनि राजेश उंदीरवाडे, नापोशी तेजराम जनबंधु, पोहवा हरीदास सुरपाम, पोशी राजेश्वर धंदरे यांनी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि सुरेंद्र उपरे करीत आहे.