कारंजा (लाड) : कारंजा येथील दिवानी व फौजदारी न्यायालयाचे माजी कर्मचारी असलेले वरिष्ठ लिपीक तथा सद्यस्थितीत,जिल्हा सत्र न्यायालय अकोलातंर्गत दिवानी व फौजदारी न्यायालय पातूर येथील कार्यरत उच्च श्रेणी वरिष्ठ लिपीक स्व.उमेश मधुकरराव कडोळे यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी अचानक उद्भवलेल्या दुर्धर आजाराने दि. १९ जून २०२५ रोजी निधन झाले असून त्यानिमित्ताने कारंजा न्यायालय जवळचे , वकिल दालनात, बार असोशिएशन तर्फे,वकिल मंडळी,न्यायालयीन कर्मचारी यांच्या वतीने मृतात्म्यास शांती व सद्गती लाभो अशा शब्दात उपस्थितांकडून भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच त्यांच्या पश्चात असलेल्या पत्नी,वयोवृद्ध आई दुगाबाई मधुकरराव कडोळे व दिव्यांग मोठे बंधू संजय कडोळे यांच्या दुःखात सहभागी असल्याच्या भावना उपस्थित वकिल मंडळींनी व्यक्त केल्या यावेळी बरेचशी ज्येष्ठ व इतरही वकील मंडळी हजर होते.स्व.उमेश कडोळे हे शांत सुस्वभावी व मनमिळाऊ व्यक्तिमत्व होते.शिवाय ते उत्कृष्ट असे गोंधळी कलावंत देखील होते. त्यांचे जाण्याने संपूर्ण कारंजा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.