वाशिम : गेल्या अनेक वर्षापासून राज्याचा महत्वाचा घटक असणाऱ्या शासकिय निमशासकिय कर्मचारी आणि कामगारांकडून शासनाकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यासाठी राज्यातील व आपल्या जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकिय निमशासकिय कर्मचारी आणि कामगारांनी अनेकवेळा आंदोलनाचे हत्यार उपसून, मंत्रालयावर मोर्चे, धरणे आंदोलन, आमरण व बेमुदत उपोषण देखील केलीत परंतु प्रत्येकवेळी शासनाने चालढकल केली.त्यामुळे समाजातील महत्वाचा घटक असणाऱ्या कर्मचारी वर्गाकडून जुन्या पेन्शनची मागणी होतच आहे. अखेरीस ही मागणी लक्षात घेऊन महाविकास आघाडीने आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात,महाविकास आघाडी सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा मुद्दा समाविष्ट केल्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,शासकिय निमशासकिय व खाजगी कर्मचारी कामगार यांनी महाविकास आघाडीच्या सकारात्मक भूमिकेबद्दल समाधान प्रगट करीत आंदोलनात आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या, महाविकास आघाडीलाच,येत्या दि 20 नोहेंबर रोजी मतदान करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पक्षाच्या जाहिरनाम्याचा लाभ मिळून कर्मचारी कामगाराचे भरभरून मतदान कारंजा मानोरा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेद्वार अँड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनाच मिळणार असल्याचे आमचे प्रतिनिधी प्रदिप वानखडे यांनी कळवीले आहे.