कारंजा (लाड) : पौराणिक काळात वसिष्ठ ऋषींच्या सप्तर्षी शिष्यमंडळी पैकी,करंज ऋषींनी तपश्चर्या करून स्थापन केलेल्या कारंजा नगरीमधील,आद्यशक्ती कारंजेकरांचीची कुलस्वामिनी आणि शिवछत्रपती शिवरायांचे ऐतिहासिक शक्तीपीठ असलेल्या,श्री कामक्षा देवीच्या शारदीय नवरात्री उत्सवाला सोमवार दि.२२ सप्टेंबर २०२५ पासून शुभारंभ होणार असून ,श्री नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की,संपूर्ण भारतात श्री कामाक्षा देवीचे दोन ठिकाणी शक्तीपीठ आहेत.त्यातील एक म्हणजे आसाम राज्यातील गोहाटी व दुसरे वाशिम जिल्ह्यातील पवित्र शक्तिपीठ कारंजा नगरी होय.श्री कामाक्षा माता ही नवसाला पावणारी मनोकामना पूर्ण करणारी जागृत देवी म्हणून ओळखल्या जाते.दरवर्षी नवरात्री उत्सवानिमित्य भव्य यात्रा मंदिर परिसरात भरत असते.या मंदिराचा कारभार महाजन कुटुंबाकडे आहे. सोमवार दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी देवीचा मंगलाभिषेक व घटस्थापना होणार आहे, त्यादिवशी रात्री नऊ वाजता मुरलीधर महिला भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम होईल ,दि.२३ला दुपारी ३:०० वाजता रुक्मिणी महिला भजनी मंडळ व रात्री वनेश्वर महिला भजनी मंडळ ; दि २४ ला दुपारी स्वरांजली महिला भजनी मंडळ व रात्री ०८:०० वाजता नेहा संजय किटे यांचा कराओके संगीतावर भजनाचा कार्यक्रम ; दि २५ ला श्री.गजानन महाराज महिला भजनी मंडळ महावीर कॉलनी व रात्री सदगुरू महिला भजनी मंडळ ; दि.२६ ला दुपारी सुकन्या महिला भजनी मंडळ शिक्षक कॉलनी व रात्री अष्टविनायक गुरुदेव भजनी मंडळ ; दि.२७ ला दुपारी तुळजाभवानी महिला भजनी मंडळ व रात्री ०७ : ३० ला षष्ठीचा जोगवा श्री कामाक्षा माता गोंधळी कला संच कारंजा श्री ज्ञानेश्वर कडोळे व परिवार यांचा जोगव्याचा कार्यक्रम नंतर महालक्ष्मी महिला भजनी मंडळ ,दि . २८ ला दुपारी गुरु गजानन महिला भजनी मंडळ सुंदर वाटिका, दि. २९ ला दुपारी ०२:०० ते ०५ :०० पर्यंत श्री स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरी प्रणित उपासकाचे सप्तशतीपाठ व रात्री ०९:०० वाजता महाअष्टमीचे होम हवन, पूर्णाहुती व देवीची महाआरती रात्री १२:०० वाजता होणार आहे नंतर दीपमाळ प्रज्वलन कार्यक्रम होईल, दि . ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी नवमी असल्यामुळे देवीचा महानैवेद्य व रात्री ०७:०० ला सौ. अर्चनाताई तोमर (अध्यापिका) यांचा कराओके संगीतावर भक्ती संगीताचा कार्यक्रम ,दि . २ ऑक्टोबरला विजयादशमी निमित्त सकाळी महाभिषेक,श्री कामक्षा मातेचा श्रृंगार व सिमोलंघन होऊन देवीची महाआरती होईल, नवरात्र उत्सवात दररोज देवीची आरती दुपारी १२:०० वाजता व रात्री ०७:०० वाजता होईल . तरी मातृउपासकांनी श्री.कामाक्षा मातेच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.कामक्षा माता संस्थान कडून दिगंबर महाजन महाराज व नवरात्रोत्सव समिती आणि आई श्री कामाक्षा भक्त परिवाराचे संजय कडोळे यांचे कडून भाविकांना करण्यात आले असल्याचे वृत्त रोहीत महाजन यांनी कळविले आहे.