कारंजा (जिल्हा प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या कलेला, सुप्तगुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील प्रतिभा इतरांसमोर यावी या करिता कारंजा शहरातील नामांकित नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे दी. 11 फेब्रुवारी रोजी श्री कामाक्षा देवी मंदिर मध्ये वर्ग 3 री ते 9 वी च्या विद्यार्थ्याकरिता रामानुजन टॅलेंट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता शहरातील एकूण 850 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
ही स्पर्धा एकूण चार गटात विभागण्यात आली होती ज्यामध्ये 3 री व 4 थी चा एक गट,
5 वी चां दुसरा गट , 6 वी ,7 वी यांचा तिसरा गट, तर 8 वी व 9 वी चा चौथा गट ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गणित या विषयावरील प्रश्न विचारण्यात आले होते आणि स्पर्धेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे पेपर पॅड देण्यात आले.
स्पर्धेचा निकाल 25 फेब्रुवारी लां लावण्यात येणार असून स्पर्धेच्या प्रत्येक गटातील यशवंत विद्यार्थ्यांना प्रथम बक्षीस म्हणून स्टडी टेबल, दुसरे बक्षीस स्कूल बॅग तर तिसरे बक्षीस म्हणून स्टडी किड्स देण्यात येईल.
या स्पर्धेकरिता नेक्स्ट स्टेप अकॅडमी चे शुभम गोरटे सर, हेमंत राठोड सर, सारंग गोरटे सर, रुपाली गोरटे मॅडम , ऋतुजा मॅडम , फुलाडी मॅडम ,सुशांत सर यांनी व्यवस्थापन केले तसेच स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सुनील गोरटे सर, सौ उज्वला गोरटे मॅडम, प्रतीक चीमागावे ,अनुज देशमुख सर , मीनल शंकरपुरे ,सोनाली हिंगमिरे यांनी मोलाचे योगदान दिले. असे वृत्त शुभम गोरटे यांनी आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांना कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....