कारंजा (लाड) : - अखिल भारतिय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती संघटनेच्या नियामक मंडळाकरीता वाशिम जिल्हयातून उमेद्वार तथा कारंजा येथील हाडाचे सामाजिक कार्यकर्ते तथा नाट्यकलावंत- नंदकिशोर अंबादास कव्हळकर हे प्रचंड मतांनी विजयी घोषीत झाल्याचे कळताच कारंजा येथील सर्वपक्षिय कार्यकर्ते तथा कलावंत व मित्रमंडळीनी त्यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करून फटाक्याची आतिशबाजी करीत अक्षरशः दिवाळी साजरी केली. यावेळी महिलां कलावंतानी त्यांचे औक्षवाहन केले तर मित्रमंडळीनी गुलाल व फुले उधळीत पेढे भरवीत आनंद साजरा केला. याप्रसंगी विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन माजी मुख्याध्यापक रविन्द्र नंदाने यांचे अध्यक्षतेखाली करीत विदर्भ लोककलावंत संघटना, ईरो फिल्मस् प्रॉडक्शन, आदर्श जय भारत सेवाभावी संस्था,अष्टविनायक कल्चरल ग्रुप,करंजमहात्म्य परिवार व अखिल भारतिय नाट्य परिषद कलावंताकडून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला याप्रसंगी संजय कडोळे यांनी अभिनंदन पर संभाषण करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.अध्यक्षीय भाषणामधून बोलतांना, सच्च्चा बहुजन नाट्यकलावंताची निवड नियामक मंडळावर झाल्याबद्दल समाधान व्यक्त करीत, त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्यात. तर विजयी उमेद्वार नंदकिशोर कव्हळकर यांनी हा विजय माझा नसून,माझेवर विश्वास बाळगून मला मतदान करणाऱ्या सर्वधर्मिय बहुजनांचा, नाट्यकलावंताचा, सर्व मतदारांचा, स्थानिकच्या उमेद्वाराचा विजय असल्याचे स्पष्ट करीत,निवडणूका संपल्या . मतभेदही संपले. आता मात्रा केवळ नाट्यक्षेत्राच्या विकास कामाला व नाट्यकलावंताना त्यांचे न्याय्यहक्क मिळवून देण्याच्या कार्याला, सर्वांना सोबत घेऊन तन मन धनाने लागायचे असल्याचे स्पष्ट केले आहे.