अकोला :- राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ति सेवा पुरस्कारार्थी संघटनेची महत्वपूर्ण सभा, सोमवार दि.28 ऑगष्ट 2023 रोजी दुपारी 01:00 वाजता,स्थानिक शिक्षक भवन,महानगर पालिका पाण्याच्या टाकीजवळ,रेल्वे स्टेशन,अकोला येथे ज्येष्ठ नाटककार प्रा.पि.जी.भामोदे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये ज्येष्ठ साहित्यीक,सामाजिक कार्यकर्ते,लोककलावंत तथा पत्रकार असलेले संजयजी कडोळे सर,प्रदेशाध्यक्ष अशोकजी रामटेके सर,प्रदेश उपाध्यक्ष राम शेगोकार सर,सप्तखंजरी प्रबोधनकार विजयजी पांडे तथा कविवर्य राजेंद्र भटकर हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, भारतिय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आम्बेडकर आणि अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.या नंतर उपस्थित अतिथिचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. या वेळी मागील वर्षाचे इतिवृत्त व लेखा जोखा वाचून दाखविन्यात आला,त्याच प्रमाणे जमा व खर्चास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. सभे मध्ये प्रामुख्याने,आपले संपूर्ण आयुष्य व्यसनमुक्ती प्रबोधनात घालविणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त असलेल्या सच्च्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य शासनाने वृद्धापकाळा करीता, दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्याच्या मागणी वर प्रस्ताव घेण्यात देऊन चर्चा करण्यात आली.
त्याच प्रमाणे व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारार्थी यांच्या विविध मागण्या संदर्भात.लवकरच संघटनेच्या शिष्टमंडळाद्वारे मा. मुख्यमंत्री महोदय तथा सामाजिक न्याय मंत्री व उप मुख्यमंत्री यांना मुंबई येथे जाऊन प्रत्यक्ष भेटून संघटनेच्या मागण्याबाबत निवेदन देण्याचे ठरविन्यात आले.त्याच प्रमाणे यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ति पुरस्कारार्थी संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष म्हणून संजयजी कडोळे यांची प्रदेश कार्यकारिणीकडून एक मताने निवड करण्यात आली. उपस्थितांनी संजयजी कडोळे यांना नविन जबाबदारी बद्दल शुभेच्छा दिल्या.उपस्थित सर्वांनी आपले विचार व्यक्त केले. सप्तखंजेरी प्रबोधनकार शाहिर विजय पांडे,कविवर्य राजेन्द्र भटकर, साहित्यीक संजय कडोळे व कवी आंनद गोठकडे यांनी आपल्या कविता व लोकगीतांचे सादरीकरण करून सभेला चांगलीच रंगत आणली.त्याच प्रमाणे प्रा.पि.जी.भामोदे सरांचा योगायोगाने आजच वाढदिवस असल्याने संघटनेकडून त्यांचा सत्कार करण्यात येऊन सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अशोक रामटेके,प्रदेश उपाध्यक्ष राम शेगोकार सर, शाहिर विजय पांडे,शाहिर राजेंद्र भटकर,संजयजी कडोळे,पी.जी. भामोदे सर,आनंद गोठाकडे इ.चे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रदेश अध्यक्ष अशोक रामटेके यांनी केले.