मुलांना शाळेतून आणताना समोरून येणाऱ्या स्फोटकाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने मोटार सायकलला धडक दिली. यात बापलेक वेगवेगळ्या दिशेने पडले. सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. र सदर घटना माजरी येथे मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. यात दुचाकी चेंदामेंदा झाली.
माजरी येथील विलास दुर्गाप्रसाद खस (34) मंगळवारी दुपारी दोन्ही मुलांना शाळेतून दुचाकीने घरी घेऊन जात होते. बाजारपेठेतील ताजकिराणादुकानासमोर समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकी पूर्ण चेंदामेंदा झाली. सुदैवाने कुठलीही जीवतहानी झालेली नाही.