आज शुक्रवारची सकाळ ही चंद्रपूर पोलिसांना हादरविणारी ठरली, 43 वर्षीय सुशील कुंभलवार या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.
त्यांनी आत्महत्या का केली याबाबत अजूनही कारण अस्पष्ट आहे.
सुशील कुंभलवार हे गडचिरोली पोलीस दलातील कर्मचारी होते, जिल्हा बदलीनंतर ते चंद्रपुरात दाखल झाले, 5 वर्षे चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते, 2 वर्षांपूर्वी त्यांची राजुरा पोलीस ठाण्यात बदली झाली होती.
यादरम्यान त्यांची प्रकृती खालावली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली, ते तब्बल 8 महिने रुग्णालयात दाखल होते, नुकतेच 5 महिन्यांपूर्वी ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.
कुंभलवार हे परिवारासहित घुटकाला प्रभागात राहत होते, सकाळी घरी कुणी नसताना त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
सदर घटनेमुळे चंद्रपूर पोलीस दल हादरुन गेले आहे.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला आहे.