वाशिम : प्रजासत्ताक भारतिय गणराज्य भारताच्या संविधानावरच चालतं.आणि भारतिय संविधानाने सर्वांना सम समान न्याय व अधिकार देतांना, लोकसंख्येने कमी प्रमाणात असणाऱ्या,अनुसूचित जाती जमाती,भटक्या व विमुक्त जाती जमाती,इतर मागासवर्गीय जाती आणि अल्पसंख्यांक समुदायाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आणि दर दहा वर्षांनी जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु आरक्षण असतांनाही अनेक वेगवेगळ्या धर्म भाषा प्रांत जातींमधील जनजाती, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतर आजही हव्या त्या प्रमाणात शासकिय सवलती मिळत नसल्यामुळे, प्रत्यक्षात शासकिय सोयीसवलती मधून मिळणाऱ्या शासकिय योजनां पासून अलिप्त राहीलेल्या आहेत. या पाश्वभूमिवर आमच्या महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती संघाद्वारे व तत्कालिन गोंधळी समाज उन्नती संघाद्वारे सन १९८७ व १९९१ मध्ये स्वराज्य भवन अकोला येथे, राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन, जातीनिहाय जनगणनेची मागणी शासनाकडे लावून धरलेली होती. सदहू अधिवेशनाकरीता आम्हाला भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने यांचे मार्गदर्शनही लाभले होते.या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री शरदचंद्र पवार,राज्यमंत्री अनंतराव देशमुख,आमदार लक्ष्मणराव तायडे,आमदार अजहर हुसेन, भटक्या विमुक्ताचे स्थानिक नेते बाबा भारती, स्व.नामदेवराव मुदगल,स्व.शिवकुमार लाघे, स्व. वि.ग.पाटील नाथ समाज,शाहिर स्व. किसनराव महाजन,स्व. गणपतराव दोर्वेकर,श्रीरामजी सोनोने,संजय कडोळे उपस्थित होते.यावेळी सर्वच उपस्थितांनी आपल्या समाजाची एकूण संख्या कळावी,समाजाचा एकोपा रहावा व समाजाच्या एकूण संख्येंच्या प्रमाणात आम्हाला शासकीय सोईसवलती मिळाव्या ही एकमुखी मागणी रेटून धरली होती.व त्यानंतरही महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी शासनाकडे जातनिहाय जनगणनेची मागणी वेळोवेळी रेटून धरली होती.परंतु आजपर्यंत ही मागणी पूर्णत्वास गेलेली नव्हती.परंतु असो आता उशीरा का होईना आदरणिय पतंप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी "देशांतर्गत जातनिहाय जनगणनेचा चांगला निर्णय घेतला." ह्या निर्णयाचे जिल्ह्यातील आम्ही सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोकं, सर्वच गोंधळी समाज बांधव स्वागत करीत असून, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील नागरीकांची नेमकी लोकसंख्या शासनाला व प्रत्येक समाजाला कळणार आहे व त्यामधून गरजू लोकांना त्यांच्या हक्काचे आरक्षण देवून शासकीय सोयीसवलती देण्याचा मार्ग सुकर होऊन देशांतर्गत लोकशाही बळकट होण्यास हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष, भटक्या जमातीचे नेते तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संजय कडोळे यांनी दिली आहे.