कारंजा (लाड) ; नुकतेच राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत गवळी समजाकरिता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याकरिता मान्यता मिळाली आहे. त्या करिता गवळी समाज संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार हंसराज अहिर यांनी मुख्य भूमिका असल्याने त्यांचा गवळी समाज संघटनेच्या वतीने कारंजा येथील हॉटेल मधुबन येथे सत्कार करण्यात आला आहे.
या वेळी गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष जुम्मा भाई बंदूकवाले, प्रदेश उपाध्यक्ष कासम भाई नौरंगाबादी माझी जिला अध्यक्ष हाजी कयूम जाटावाले कोषाध्यक्ष वकील गारवे कसम भाई बंदूक वाले हसन भाई बंदूक वाले कासिम कालु मुनि वाले जब्बार पप्पू वाले कसम भवानी वाले चांद आरिफ नुमान इब्राहिम इरफान इमरान वहीद गारवे आदि सह बहुसंख्य समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*