ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये कुणबी समाज मोठ्या संख्येने असून विविध पोट जातीमध्ये विखुरला असल्याने या समाजामध्ये एकी बघायला मिळत नव्हती मात्र कुणबी समाजातील विविध पोट जातील मधील युवा वर्ग एकत्र आले व अखिल कुणबी समाज मंडळाच्या अत्यारीत या युवावर्गांनी अनेक उपक्रम राबवण्याची योजना आखली आहे.
अखिल कुणबी समाज मंडळाद्वारे ब्रह्मपुरी येथे 36 आर शेतजमीन खरेदीचा करारनामा करण्यात आला असून या जागेची खरेदी करण्याकरिता एकूण 97 लाख रुपये किंमत मोजावी लागणार आहे व खरेदी पत्र बनवण्याकरिता अंदाजे तीन ते चार लाख रुपयाची परत गरज आहे असे एकूण एक करोडच्या वर रुपये रक्कम या शेतजमिनीच्या खरेदी करिता लागणार आहे व बांधकामाकरिता याहीपेक्षा मोठी रक्कम लागणार आहे.
यानिमित्ताने दिनांक 10 जून रोजी वर्गणी गोळा करण्यात आली या पहिल्याच दिवशी सहा लाख 59 हजार रुपये वर्गणी गोळा करण्यात आली पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्या मोठी रक्कम जमा झाल्याने कार्यरत असलेल्या युवामणगाव मध्ये व समाजामध्ये मोठा उत्साह निर्माण झाला व आणखी वर्गणी जमा करण्याची नवीन नवीन युक्ती योजून वर्गणी जमा करण्याचे निर्माण कार्य सुरू झालेले आहे.
समाजभावनाची निर्मिती हे काही विशिष्ट लोकांकरिता नसून सर्व अखिल कुणबी समाज बांधवाकरिता असल्याने समाजातील कर्मचारी व्यापारी मोठे व्यावसायिक कंत्राळदार यांनी मोठी वर्गणी देऊन समाजकार्यामध्ये सहभाग द्यावा तसेच समाजातील आर्थिक दुर्बल / कमकुवत घटकांमधील ज्यांची जेवढी योग्यता आहे त्याप्रमाणे वर्गणी द्यावी असे अशी विनंती ही समाज मंडळा कडून करण्यात येत आहे