कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे ): अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून आज जनमाणसामध्ये सुपरीचीत आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणेच नाही तर, त्यांच्या मध्ये राष्ट्राप्रती सामाजीक भावना निर्माण करण्याचं कार्य अभाविप निरंतर करीत आहे.यावर्षी अभाविप ही संघटना आपल्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या औचीत्याने,नगरातील गुणवंत विद्यार्थी ह्यांचा सत्कार व नगराची कार्यकारीणी घोषणा दिनांक 8 जुलै रोजी करण्यात आली याबाबत अधिक वृत्त असे की,कारंजा येथील किसनलाल नथमल कला व वाणिज्य महाविद्यालय सभागृह येथे हा अमृत महोत्सवी कार्यक्रम, बेरार एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारीणी सदस्य डॉ.अजय कांत यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला तर कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून तहसीलदार मा. कुणाल झालटे,प्रमुख वक्ते विद्याभारतीचे वाशिम जिल्हाध्यक्ष दिलीपजी जोशी हे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये प्रा.डॉ.विनय कोडापे व किशोर मुळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभाविप च्या 75 वर्षाच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. ह्या वेळी तदनंतर विद्यार्थी सत्कार समारंभ घेण्यात आला .एकूण 40 गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे , कारंजा नगराची 2023 - 24 ची कार्यकारीणी सुद्धा ह्या वेळी घोषीत करण्यात आली. नवनिर्वाचीत नगर अध्यक्ष प्रा.डॉ. किरण वाघमारे व नवनिर्वाचीत नगर मंत्री रुद्र लोटे, नगर सह मंत्री ओम शेलवंते व अंजली शिंदे, कार्यालय प्रमुख म्हणून मंथन मोरे, सोशल मिडिया प्रमुख म्हणून गौरव राठोड , कोष प्रमुख म्हणून स्वप्नील कडू , व्यवस्था प्रमुख म्हणून सौरभ जयराज, महाविद्यालय प्रमुख म्हणून अभिषेक मडके, प्रसिद्धी प्रमुख म्हणून सुजित कदम, वस्तीगृह प्रमुख ब्रम्हा चव्हाण, आयाम गतिविधि गतिविधि प्रमुख म्हणून सौरव पांडे तर सदस्य म्हणून निलय बोन्ते, नैतिक बांडे, सुमित बरंडे,आशुतोष द्विवेदी, योगेश शेळके व मनोज साबळे ह्यांची घोषणा करण्यात आली.