कारंजा (जिल्हा प्रतिनिधि संजय कडोळे )
कारंजा-राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपुर,माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद वाशिम, जिल्हा मुख्याध्यापक संघ वाशिम, जिल्हा व तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन दोन तालुक्या मिळून करण्यात आले आहे.त्याची सुरवात आज पासून होणार आहे.आज दिनांक 22 ऑगस्ट ला कारंजा व मानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन ब्लू चिप कान्वेंट,कारंजा येथे सकाळी 11:00 वाजता करन्यात येणार आहे.
यावर्षीच्या विज्ञान मेळाव्याचा विषय भरड धान्य-एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम? हा आहे. या विषयावर विद्यार्थ्यांना सहा मिनिटे आपले विचार व्यक्त करायचे आहेत. त्यावर परीक्षक त्याला दोन ते तीन प्रश्न विचारणार, स्पर्धेत सहभागी विद्यार्थी तीन ते पाच चार्ट किंवा पीपीटीचा उपयोग करू शकतील. या मेळाव्याकरिता एका शाळेतून वर्ग आठवी, नववी व दहावीं पैकी कोणताही एक विद्यार्थी सहभाग नोंदवू शकतो.
तालुकास्तरीय मेळाव्यातून दोन विद्यार्थ्यांची निवड होऊन ते जिल्हास्तरा करीता पात्र होतील.उद्या दिनांक 23 ऑगस्ट रोजी वाशिम व मंगरुळ तालुक्यातिल विद्यार्थ्यांकरीता राधादेवी बाकलीवाल विद्यालय, वाशिम येथे तर दिनांक 24 ऑगस्ट रोजी
मालेगांव व रिसोड तालुक्यासाठी महात्मा फुले विद्यालय, रिसोड येथे आयोजित कलेला आहे. तसेच जिल्हास्तरिय विद्यार्थी विज्ञान मेळावा दिनांक 25 ऑगस्ट रोजी राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, वाशिम येथे आयोजित केला आहे.
सदर मेळाव्याला शिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी व विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विज्ञान मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे, योजना शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, उपशिक्षणाधिकारी आकाश आहाळे व विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव विजय भड यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....