जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खाली निवड समितीचे गठन.कलावंताचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याचे दृष्टीने जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरु.
वाशिम : निव्वळ लोककलाकारांच्या समाज सेवेकरीता जिल्ह्यात कोणत्याही राजकिय पक्षाचे राजकारण न करता आणि निर्भीड, नि:ष्पक्ष,सेवाव्रती कार्य करणाऱ्या विदर्भ लोककलावंत संघटनेने गेल्या पाच वर्षात जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार निवड समिती स्थापना होऊन कलावंताना मानधन सुरु व्हावे आणि वाढत्या महागाईला अनुसरून मानधन वाढ व्हावी याकरीता तसेच लोककलावंताच्या न्याय्य हक्का करीता कितीतरी आंदोलने करून, कलावंताच्या समस्या शासन दरबारी मांडल्यात. त्याकरीता विदर्भ लोककलावंत संघटनेने वेळोवेळी केन्द्रशासनासह राज्यसरकार सोबत लेखी पत्रव्यवहार केला. मुख्यमंत्री पालकमंत्री त्यांचे खाजगी सचिवा सोबत संवाद साधला.मागील महिन्यात बुधवार दि 24 जानेवारी 2024 रोजी "जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम" येथे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त नि:ष्पक्ष व हाडाचे ज्येष्ठ लोककलावंत असलेले, विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात लोककलांवतानी विराट असे "क्रांतिकारी धरणे आंदोलन" केले होते. या आंदोलनाला जिल्ह्यातील आमदार अमित झनक, शिक्षक आमदार ॲड किरणराव सरनाईक यांचे सह मनसे, काँग्रेस सेवादल, शिवसेना शिंदे गट,संभाजी ब्रिगेड वंचित,आरपिआय आदी सर्वपक्षियांचा जाहीर पाठींबाही मिळाला होता.अखेर माननिय जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेने विदर्भ लोककलावंत संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन आणि लोककलावंताच्या भावना समजून घेत,जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरिय वृद्ध कलावंत निवड समिती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या अधिकारात उप समित्या स्थापन करून,आदर्श व पारदर्शक निवड प्रणालीद्वारे कलाकारांचे सादरीकरण व मुलाखतीचा निवड कार्यक्रम सुरु केला आहे. हे सर्वच लोककलावंताच्या दि 24 जानेवारीच्या निर्णायक क्रांतिकारी आंदोलनाचे फलीत मानले जात आहे. त्यामुळे अखेर शासनाने लोककलांवताची दखल घेतल्याबद्दल विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी समाधान व्यक्त करीत उदार अंतःकरणाने जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी यांना धन्यवाद देत त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहे.