अकोला :-
पी. एम. श्री मनपा सेमी इंग्रजी मुलांची शाळा क्रमांक 7, रामदासपेठ येथे माजी नगरसेवक मा. राहुलभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप, वृक्षारोपण आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व मान्यवरांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुहासिनी ताई धोत्रे होत्या. आपल्या मनोगतात त्यांनी “आई-वडिलांचा आशीर्वाद व संस्कार असल्याशिवाय कोणीही खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकत नाही,” असे भावस्पर्शी उद्गार काढले आणि उपस्थितांचे मन जिंकले.
या प्रसंगी मा. राहुलभाऊ देशमुख यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, मागील अनेक वर्षांपासून शाळा क्रमांक 7 मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहून शाळेला नवी ओळख निर्माण करणारे, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अथक प्रयत्न करणारे आणि नुकतेच नवनियुक्त शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्विकारलेले श्री. हरीशचंद्र इतकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला मा. आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या पत्नी सौ. मंजुषा ताई सावरकर, नगरसेवक प्रशांत अवचार, सौ. चंदाताई शर्मा, सौ. सारिकाताई जयस्वाल, श्री. अजय इंगळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे नियोजन व उत्कृष्ट आयोजन सौ. निकिता ताई देशमुख यांनी केले तर या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.नयना कृष्णराव गोटे केले. यांनी केले तर शाळेतील विद्यार्थ्यांना दिलेल्या भरीव मदतीबद्दल शिक्षणाधिकारी श्री. हरीशचंद्र इतकर यांनी मा. राहुलभाऊ व सौ. निकिता ताई देशमुख यांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाट, मयूर पवार, रूपाली तायडे यांचे विशेष योगदान लाभले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....