वायव्य बंगालच्या उपसगरात पश्चिम बंगाल आणि ओडिशाजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा ओडिशावरून दक्षिण झारखंडच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या सिस्टमच्या प्रभावामुळे मॉन्सून पुन्हा राज्यात सक्रिय होण्याची शक्यता आहे.
तसेच वाढलेल्या उन्हाच्या अद्रतेमुळे मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस विदर्भ, मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भातील भंडार, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मुळधार पावसाची, तर राज्यात आज बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज २० तारखेपासून विदर्भात, २१ तारखेपासून मराठवाड्यात व २२ तारखेपासून मध्य महाराष्ट्रात वीजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि परिसरात आकाश समान्यत: ढगाळ राहून हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट विभागात आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नागपूरला २२ आणि २३ तारखेला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर गोंदिया, गडचरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पुढील २३ तारखेपर्यंत यलो अलर्ट सांगण्यात आला आहे. अमरावती, वर्धा येथे २२ तारखेला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मारठवड्यातील बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली येथे पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव येथेही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत पुढील काही दिवस वातावरण सामान्य राहणार आहे. उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....