"विदर्भ साहित्य संघ" डॉ. गिरीश गांधी फाउंडेशन आणि "अकोल्याची जत्रा"यांचे संयुक्त आयोजन.
अकोला : -
संत साहित्याचा खरा वारसा सुजान वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईची जेष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन परब यांच्या कुशल संपादनाखाली गेली बारा वर्षे दरवर्षी आषाढी एकादशीला "रिंगण" हा विषेशांक प्रसिद्ध होत आहे. "रिंगण" चे संपादक सचिन परब यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन अकोल्यात शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी करण्यात आलेले आहे. दुपारी ४ वाजता शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे तोष्णीवाल लेआउट येथील "प्रभात किड्स" येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात कार्तिकी एकादषीनिमित्त काढण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित "रिंगण"च्या विशेषांकाचे प्रकाशन देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात हा विशेषांक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
या प्रकट मुलाखतीमध्ये ज्येष्ठ पत्रकार सचिन परब हे "रिंगण" या वार्षिकांकाचा प्रवास, त्यानिमित्ताने आलेले अनुभव आणि त्यामुळे ट संत विचारांकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन याविषयी रसिक-वाचक-श्रोत्यांशी दिलखुलास संवाद साधणार आहेत. नामवंत मुलाखतकार आणि साहित्यिक सीमा शेटे - रोठे या सचिन परब यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या कार्यक्रमाला अकोलेकर रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला यासोबतच डॉ. गिरीश गांधी फाउंडेशन नागपूर आणि अकोल्याची जत्रा परिवाराने केले आहे.
कार्यक्रमाचा दिनांक २० डिसेंबर २०२४
कार्यक्रमाची वेळ दुपारी ४ वाजता
कार्यक्रमाचे स्थळ प्रभात किड्स, शासकीय दुध डेअरीच्या पाठीमागे, तोष्णीवाल लेआऊट, अकोला.