वरोरा :- पाच महिन्यापूर्वी मालवीय वॉर्ड येथील रहिवाशी सुभाष वांढरे यांचा मुलगा पूर्वेश सुभाष वांढरे याचा नगरपरिषद द्वारे दिलेल्या कंत्राटदराच्या दुर्लक्षितपणामुळे मृत्यू झाला. या प्रकरणातील मृतक याचा अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने पोलीस प्रशासन, नगरपरिषद यांच्या अनागोंदी निष्काळजीपणामुळे पूर्वेशला न्याय मिळण्यात दिरंगाई होत असल्याने प्रशासना विरोधात आज दि 1 जानेवारी 2025 रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
नगरपरिषदेने वरोरा येथील विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीला रुपये पाच लाख महिन्याप्रमाणे कंत्राट देण्यात आला होता. हा कंत्राट तीन वर्षासाठी होता. या कंपनीच्या कंत्राट दाराद्वारे वरोरा शहरातील मालवीय वॉर्ड येथील पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्वच्या टाक्यात सर्वत्र घाण पसरलेली होती.या टाक्यात हिरवे पानी, चपला, दारुच्या बाटला असल्याचे त्यावेळेस दिसून आले होते. त्यामुळे या वार्डातील सुभाष पांढरे यांच्या चार वर्षीय मुलागा पूर्वेश वांढरे वय पाच वर्ष याचा मृत्यू झाला. हा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याने सुभाष वांढरे यांनी नगरपरिषद, पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार नोंदवून मृत्यूस दोषी असणाऱ्या कंत्राट दारावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात निवेदन वजा तक्रार देण्यात आली होती. हा मृत्यू दूषित पाण्यामुळे झाल्याने मृतकाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात येथे करण्यात आले होते. या अहवाला मधील अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दोशींवर कारवाई केल्या जाईल असे पोलीस विभागाद्वारे सांगण्यात आले मात्र पाच महिन्याचा खूप मोठा कालावधी लोटूनही अद्यापही हा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालेला नाही. घटना घडल्यानंतर नगरपरिषद वरोरा ने व पोलीस स्टेशन वरोरा यांनी वेगवेगळ्या पाण्याचे नमुने एकाच प्रयोग शाळेत पडताळणी करण्यासाठी पाठविले होते. त्यामध्ये नगर परिषदेने पाठविलेल्या पाण्याच्या नमुन्यात हे पाणी पिण्यास योग्य आहे. तर पोलीस स्टेशन वरोरा यांच्या पाण्याचा नमुना हा पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने एकाच प्रयोग शाळेत,एकाच दिवशी, एकाच ठिकाणवरून,एकाच पाण्याचा नमुना वेगवेगळा आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. आता तर जवळ पास पाच महिन्याचा कालावधी लोटूनही अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त न होणे म्हणजेच नगरपरिषद अधिकारी विदर्भ मल्टी सर्विसेस कंपनीच्या कंत्राटदारा ला व पोलीस अधिकारी वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप मृतकाचे वडील यांनी केला आहे, सर्व सामान्य माणसाची गरीब,माणसाच्या आयुष्याची आता तर किंमतच उरली नाही का? असा प्रश्नही आता प्रशासनाला सुचवायचा नाही ना? शासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी नवीन वर्षाच्या दिवसाला आज दि. 1 जानेवारीला सुभाष वांढरे यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला सुभाष वांढरे यांची पत्नी प्रगती वांढरे व सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे, शेख , रमेश मेश्राम, शरद पुरी, अभिजित अष्टकर , मधुकर तितरे, संगीता गोचे, पल्लवी बुरडकर, मनीषा बुरडकर, आरती चव्हाण व वॉर्डातील महिला व पुरुषांची उपस्थिती होती. सायंकाळी पाच वाजता मृतक पूर्वेश वांढरे याचा फोटो घेऊन सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी , असंख्य महिला पुरुषांसोबत उपविभागीय अधिकारी जेनीत चंद्रा यांचे दालान गाठत न्यायासाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रतीलिपी जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर , पोलीस उपविभागीय अधिकारी नयोमी साटम वरोरा, अजिंक्य तांबडे पोलीस निरीक्षक वरोरा, चंद्रपूर - आर्वी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, करण संजय देवतळे आमदार वरोरा - भद्रावती विधानसभा क्षेत्र यांना देण्यात आले.