गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य दारू विक्रीमुळे गावातील कायदा , सुव्यवस्था विस्कळीत होत असल्याची बातमी सर्व प्रथम खबर महाराष्ट्राची न्यूज ने प्रकाशित केली होती. त्याचीच दखल घेत गडचिरोली पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्या विरोधात कंबर कसली. अवैध दारूची वाहतूक करताना अहेरी तालुक्यातील रेपणपल्ली उप पोलिस स्टेशन चा पोलिसांनी आज पहाटेला वाहन चालकास पकडून 17 लाख 43 हजार 125 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे स्कार्पिओ क्रमांक एम एच 33 44 53 आणि पिक अप एम एच 49 ए टी 2704 या वाहनाने आलपल्लि कडून कमलापूर गावाकडे दारूची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती रेपणपल्ली पोलिसांना मिळाली. आज पहाटेला वाहनाची झडती घेत असताना पिक अप वाहनात दारुचे बॉक्स मिळाले. चालक कार्तिक बापु दुर्गे वय 28 वर्षे राहाणार अहेरी मात्र अंधाराचा फायदा घेत स्कार्पिओ च्या वाहन चालकाने स्कार्पिओ गाडी तिथेच ठेवून फरार झाला ताब्यात असलेल्या वाहन चालकास पळून जाणारे वाहन चालकाचे नाव विचारले असता त्याचे नाव सृजल मंडल रा. चामोर्शी असे सांगितले. स्कार्पिओ गाडीत झडती घेतली असता देशी आणि इंग्लिश दारूचे बॉक्स आढळून आले.संबंधित आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून पुढील तपास रेपणपल्ली उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरिक्षक गोविंद खटिंग करीत आहेत.