अकोला ; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष व मतदार साक्षरता अभियान जिल्हा अकोला चे ब्रँड अँबेसिडर डॉ .विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण अकोला जिल्ह्यात मतदानाविषयी जनजागृती केली जात आहे. दि.1४ एप्रिल रोजी रणपिसे नगर येथे स्टुडन्ट फोरम तर्फे डॉ. विशाल कोरडे यांना स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख व्याख्याता म्हणून आमंत्रित केले होते. राज्यशास्त्र विषयात सुवर्णपदकाचे मानकरी असलेले डॉ.विशाल कोरडे यांनी उपस्थित स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना राज्यघटना त्यातील अधिकार व कर्तव्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन नव मतदारांशी डॉ.कोरडे यांनी संवाद साधला आपण मतदान कोणाला करणार या प्रश्नावर उपस्थित नव मतदारांनी आमचे एक मत राष्ट्रासाठी असे उत्तर दिले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वाचक व लेखनिक म्हणून विद्यार्थ्यांनी कार्य करावे जे विद्यार्थी प्रशासकीय सेवेत येणार आहेत त्यांनी समाज सेवा करणे गरजेचे आहे उत्तम नागरिक होण्यासाठी विद्यार्थी दशेतच आपण सामाजिक प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे असेही मार्गदर्शन डॉ.कोरडे यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ. कोरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना 26 एप्रिल रोजी मतदान करण्याची शपथ दिली.महिला मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा असे आवाहन डॉ.कोरडे यांनी केले स्टुडन्ट फोरम चे संचालक प्रा.विजेंद्र वरोकार यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक उपक्रमात सर्व विद्यार्थी नेहमीच सहभाग नोंदवतील असे अभिवचन दिले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता आसोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अस्मिता मिश्रा यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनामिका देशपांडे, सिद्धार्थ ओवे, गणेश सोळंके, विजय कोरडे, पुजा गुंटिवार , नैना लवंगे व फोरम मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .