कारंजा (लाड) : कारंजा येथील तरुण समाजसेविका कविताताई सवाई यांनी आपले आयुष्य गोरगरीब,निराधार,मनोरुग्न व वंचित घटकाच्या सेवासुश्रूषेकरीता वेचण्याचे ठरवून त्यादृष्टिने अनेक वर्षापासून आपली वाटचाल शुन्यामधून सुरू केली आहे.(आज आपण केवळ वाचतो,ऐकतो व बघतो सुद्धा की,अनाथाची माय पद्मश्री सिंधुताई संपकाळ,पद्मश्री बाबा आमटे इत्यादी समाजसेवकांनी आपली वाटचाल वंचित घटकांच्या सेवा सुश्रूमा करण्या मधूनच केली होती.अगदी त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून, सेवाव्रती कविताताई सवाई यांची सेवाकार्ये सुरु आहेत.) कविताताई यांनी वाशिम जिल्हा मुख्यालयाच्या वाशिम शहरापासून जवळच असलेल्या वाशिम ते कारंजा मार्गावरील, "सुपखेला" खेडेगावातील, सुपखेला फाटा येथे तेजस्विनी महिला बहुउदेशिय संस्थेच्या वतीने,मनोरुग्न,निराधार,वंचित घटकांकरीता "आपले घर-मनोरुग्न आश्रम." सुरु करून बेघर निवारा सेवाकार्य सुरु केले. परिसरातील मनोरुग्न,बेघर, निराधार,बेवारस वंचित घटकाचे पालन पोषण-औषधोपचार सुरू केले.सदर आश्रमात मनोरुग्नाची आंघोळ,कपडे बदलविणे,त्यांच्या करीता स्वतः स्वयंपाक करून त्यांना मायेची ऊब देत जेवणाचे घास भरवून पर्यंतची सर्व कामे, सेवाव्रती कविताताई सवाई ह्या अतिशय प्रेमाने व आनंदाने करीत असतात.त्यामुळे येथे येणारे अनेक मनोरूग्न ठणठणीत बरे होऊन त्यांच्या आप्तस्वकियांमध्ये सुद्धा परतत आहेत.असे त्यांचे सेवाकार्य सुरू असतांनाच,सदर आश्रमामधील एका बेवारस मनोरुग्नाचे निधन झाल्यामुळे, संपूर्ण शासकिय सोपस्कार पूर्ण होऊन बेवारस इसमाचे प्रेत ताब्यात मिळताच,संस्थेच्या सेवाव्रती अध्यक्षा कविताताई सवाई,सचिव गजानन भोयाळकर इत्यांदीनी - वाशिम ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार बांगर, बिट जमादार वाघमारे, सामान्य रुग्नालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.मुंढे,जय शंभो नारायण रुग्नवाहिकेचे संचालक कुणाल राठोड,इंद्रपाल ताजणे, सामाजिक युवा कार्यकर्ते निलेश सोमाणी यांच्या मदतीने,स्वतः महिला असूनही सेवाव्रती कविताताई सवाई यांनी अतुलनिय धाडसाने बेवारस मनोरुग्नाचे मृतदेहावर अंत्यसंस्कार करून, समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.त्यामुळे त्यांच्या धाडसाचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत असल्याचे वृत्त आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे. *समाजातील दानशूर मंडळीनी तेजस्विनी कविताताई सवाई यांच्या बेघर मनोरुग्न आश्रमाला भेट देवून, तन मन धनाने सहाय्य करावे. -संजय कडोळे.* एक महिला असून,शुन्यातून, समाजातील बेघर,बेवारस, रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरूग्ण वंचित घटकांना मायेची ऊब देण्याकरीत सेवाश्रम चालविणाऱ्या कविताताई सवाई यांच्या सेवाकार्याला प्रोत्साहन देण्याकरीता समाजातील जागृत दानशूर व्यक्तिंनी स्वतःहून पुढे येऊन तन मन धनाने सहकार्य करण्याचे आवाहन कारंजा येथील दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.