कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): कारंजा येथील अल्पसंख्यांक जैन समाजातील, सुप्रसिद्ध असलेल्या, "देवचंद अगरचंद जैन परिवारातील" शेतकरी मोहित शरदराव जोहरापूरकर यांचे कारंजा येथील, जयस्तंभ मार्गावरील, शहिद भगतसिंग चौक येथे, "मोहित ट्रेडिंग कंपनी" या नावाने व्यापारी प्रतिष्ठान असून,मोहित जोहरापूरकर हे शेतिपयोगी साहित्य, हातपंप, बोअरवेल्सला लागणारे पाईप,इंजिन, नळजोडणी साहित्य घरगुती पिठ गीरणी,कांडप यंत्र इत्यादी विक्री करतात.त्याशिवाय शेतकरी ग्राहकांसाठी शेती उत्पादीत वाणी ज्वारीचा हुरडा,रसायण विरहीत गुळ,गृहोद्योगाची उत्पादने जसे की, केळीचे वेपर्स,केळीचा उपवास चिवडा, मुग उडीद धान्याचे पापड वगैरेची ठोक आणि किरकोळ विक्री करतात. शेती व व्यापार ही दोन्ही क्षेत्रे जबाबदारीने सांभाळताना त्यांनी राष्ट्रसेवा व समाजसेवेला विशेष महत्व दिलेले आहे. त्यांनी नाट्य, कला,संगीत,छायाचित्रण इत्यादी छंद उत्तमप्रकारे जोपासलेले असून, जैन मित्र मंडळ,जैन समाज संघटना,अखिल भारतिय मराठी नाट्य परिषद,विदर्भ लोककलावंत संघटना, साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार इत्यादी अनेक संघटना द्वारे सेवारत राहून ते समाजसेवेतही तन मन धन लावून कार्यरत असतात.पर्यावरणाविषयी त्यांना आवड असून,आपल्या दारव्हा रोडवरील "मोहित रमणिका" या बागेत त्यांनी फळफुले व औषधीयुक्त झाडे जोपासलेली आहेत. आपल्या राष्ट्रप्रेमामुळे ते दरवर्षी दि.15 ऑगष्ट रोजी आपले प्रतिष्ठान बंद ठेवून, दुकानावरील व शेतातील मजूरांना स्वातंत्र्यदिनाची सार्वजनिक सुटी देऊन परिवार,मजूरवर्ग आणि मित्रमंडळी सह आपल्या "मोहित रमणिका" या बागेत स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करतात. आपल्या दरवर्षीच्याच परंपरेने त्यांनी दि 15 ऑगष्ट 2023 रोजी, सकाळी 07:30 वाजता ध्वजारोहण,ध्वजवंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी जोहरापूरकर परिवाराचे ज्येष्ठ आधारस्तंभ शरदरावजी जोहरापूरकर यांचे अध्यक्षते खाली,प्रमुख उपस्थित महिला सौ वैशालीताई जोहरापूरकर यांनी ध्वजारोहण केले.नंतर उपस्थितांनी सलामी देऊन,राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केले. झेंडावंदनाचा कार्यक्रम आटोपल्या नंतर मिठाईचा अल्पोपहार कार्यक्रम झाला. याप्रसंगी विशेष उपस्थिती द्वारकामाई संगीत मैफिलच्या मान्यवर कलावंता मध्ये माजी सैनिक शिवाजीराव गायकवाड व सौ गायकवाड,डॉ.कुंदन श्यामसुंदर सौ श्यामसुंदर, गायक ज्ञानेश्वर खंडारे, सौ वंदना खंडारे यांची उपस्थिती लाभली.त्यांनी देशभक्तीपा गान प्रस्तुत केले. कार्यक्रमाला ललित रोडे,सौ रोडे, दिनेश शेंधवकर,सौ शेंधवकर, आशिष चौधरी सौ चौधरी, राजेश रुईवाले,सौ रुईवाले,प्रविण करडे, नंदकिशोर कव्हळकर,सौ कव्हळ्कर यांची उपस्थिती लाभली. "भारत माता की जय !" "वंदे मातरम" च्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
आपल्या प्रतिक्रिया द्या....