वाशिम - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज जागृतीसाठी सुरू केलेल्या मूकनायक ह्या पाक्षिकाला १०४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक पाटणी कर्मशियल कॉम्प्लेक्समधील चिंतामणी कॉन्फरन्स हॉलमध्ये मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा व पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्षा सुरेखाताई संजूभाऊ वाडे यांनी केले आहे आहे.*
कार्यक्रमानिमित्त सम्राट टाइम्स वृत्तपत्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा आयोजन समिती अध्यक्ष पत्रकार सुनील कांबळे, उद्घाटक जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील माजी संपादक भूपेंद्र गणवीर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे दलितमित्र गोपाळराव आटोटे गुरुजी, अप्पर पोलिस अधिक्षक तांगडे, जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा, जिल्हा आरोग्य अधिकारी सुहास कोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतिश इंगळे आदी मान्यवरांची उपस्थित लाभणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष माधवराव अंभोरे, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नितीन पगार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी, वाशिम जिल्हा वृत्तवाहिनी संघाचे किशोर गोमासे, महारष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ इंगोले, अध्यक्ष महारांष्ट्र प्रदेश व्हॉईस ऑफ मिडिया इरफान सैय्यद, साप्ताहिक माध्यम प्रतिनिधी संदीप पिंपळकर आदींची उपस्थिती राहणार आहेत.
विशेष उपस्थितीमध्ये संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ अध्यक्षा प्रतिभाताई रामप्रभू सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिध्दार्थ देवळे, समाजसेवक माणिकराव सोनोने, समाजसेवक मधुकरराव जुमडे, स्त्री रोगतज्ञ डॉ. तुषार गायकवाड, नारी शक्ती फाऊंडेशन महारष्ट्र अध्यक्षा संगीताताई वसंतराव इंगोले, पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष दौलतराव हिवराळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, जि. प. सदस्या कल्पना कैलास राऊत, समाजसेवक अनिल ताजने, समाजसेवक राजीव दारोकर, समाजसेवक अनंतकुमार जुमडे, समाजसेवक आशिष इंगोले, भाजपा अभियंता सेलचे धनंजय घुगे, वंचितच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई मिलिंद इंगळे, जिल्हा उपाध्यक्षा मेघाताई किरण डोंगरे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी कार्यक्रमाला जिल्ह्यातील पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्षा सुरेखाताई संजूभाऊ वाडे आणि आयोजन समिती मार्गदर्शक बबनराव खिल्लारे, अध्यक्ष सुनील कांबळे, विनोद तायडे, अजय ढवळे, पप्पू घुगे, प्रमोद खडसे, संतोष वानखडे, विशाल राऊत, संदीप डोंगरे, डॉ. माधव हिवाळे, दादाराव गायकवाड, दिनेश पठाडे, राजकुमार पडघाण, महेंद्र ताजने, प्रवीण पट्टेबहादूर, संजय खडसे, माधव डोंगरदिवे आदींनी केले आहे.
यावेळी अनिल कांबळे, मोहन शिरसाट, बबनराव खिल्लारे, विनोद तायडे, अजय ढवळे, संदीप डोंगरे, सुधाकर पखाले, सुभाष तायडे, किरण पखाले, बबन कांबळे, डॉ. माधव हिवाळे, रवी अंभोरे, वसंत इंगोले, राजाभाऊ इंगोले, नानाभाऊ देवळे, विनोद डेरे, अविनाश भगत, माणिकराव डेरे, प्रवीण आडुळे, संतोष कांबळे, बळवंत भगत, रा. ना. अंभोरे, दिगंबर सोनोने आदी पत्रकारांचा मान्यवरांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह, मूकनायक पुस्तक देवून सत्कार करण्यात येणार आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....