कारंजा : कारंजा [लाड] येथील पेशाने मुख्याध्यापक असलेले, युवा पत्रकार विजय देविदास भड [सर]हे अचानक दि .25 मार्च 2022 रोजी , कारंजा शहरातून अदृश्य झाल्याची वार्ता पसरली आणि कारंजा शहरातील नागरिकांसह पत्रकारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरल्याने चिंता वाटू लागली, "नेहमी दुसऱ्याच्या सुखंदु:खात सहभागी होणारे, खंबीर पत्रकार, धाडसी सामाजिक कार्यकर्ते आणि यशस्वी मुख्याध्यापक अचानक अदृश्य होतातच कसे ? असा प्रश्न जो तो एकमेकांना विचारू लागला." विजय भड [सर] हे हसतमुख, हजरजवाबी, कर्तव्यदक्ष, मनमिळाऊ म्हणून ओळखले जातात आणि सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते . यामुळे प्रत्येकालाच त्यांची चिंता भेडसावत असल्यामुळे, मा . पोलिस अधिक्षक वाशिम यांनी त्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा . व विजय भड [सर] जेथे कोठे असतील तेथून सुखरूप परत यावेत म्हणून महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम जिल्हा शाखा तथा कारंजा पत्रकार मंडळीच्या वतीने, तहसिलदार कारंजा यांचे मार्फत पोलिस अधिक्षक वाशिम यांना, जिल्हाध्यक्ष तथा साप्ताहिक करंजमहात्म्यचे मुख्यसंपादक संजय कडोळे यांचे नेतृत्वात, निवेदन देण्यात आले . निवेदन देतेवेळी, कालूभाई तवंगर, आरिफ पोपटे, मोहम्मद मुन्निवाले, दाऊद मुन्निवाले, विजय पाटील खंडार, सुरज फुलमाळी, धनंजय राठोड, उमेश अनासाने, कैलास हांडे, राजेश भगत, विजय राऊत, उषाताई नाईक इत्यादी पत्रकार मंडळी उपस्थित होती . यावेळी तहसिल कार्यालयातर्फे निवासी तहसिलदार विलास जाधव तथा नायब तहसिलदार विनोद हरणे यांनी निवेदन स्विकारले .