अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही आज जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या पासुन त्यांच्या मध्ये विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून राष्ट्राप्रती जागरूकता निर्माण करण्याचे कार्य गेल्या 76 वर्षांपासून निरंतर करत येत आहे.
नुकतेच 10 वी व 12 वी चे बोर्डाचे पेपर संपले असुन विद्यार्थी ‘त्या नंतर काय’ ह्या प्रश्नाला घेऊन सतत चिंतेत असतो. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कारंजा लाड तर्फे एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन विद्याभारती महाविद्यालय येथे करण्यात आले. ह्या वेळी शिबिराचे उद्घाटन अभाविप अकोला विभागाचे विभाग संयोजक सुमित बरांडे ह्यांनी केले. करिअर मार्गदर्शन, तणाव व वेळ व्यवस्थापन, सायबर सिक्युरिटी व यूथ लीडरशिप अशा विविध सत्राच्या माध्यमातून तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले.
ह्या शिबिरास संपूर्ण कारंजातील १० वी व १२ वी चे विद्यार्थी उपस्थित होते. व्यक्तिमत्व विकास शिबिर हे हे नव तरुणांना भविष्याची दिशा प्राप्त करून देण्याचा उत्तम मंच आहे असे वक्तव्य उद्घाटनाच्या वेळी उद्घाटकानी संबोधून सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ह्या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राध्यापक डॉ. राजगुरे सर ह्यांनी विशेष मदत दिली. ह्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी नगर कार्यकारिणीच्या विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न केले.