धर्मादाय रुग्णालयात आरक्षित खाते खाट निर्धन आणि दुर्बल घटकासाठी पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये अकोला जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर व सामाजिक तसेच अभ्यासू नेतृत्व म्हणून सर्वांना सोबत घेऊन चालणारे आमदार हरीश पिंपळे यांची राज्य शासनाने निवड केली आहे.
राज्यात व जिल्ह्यात धर्मदाय रुग्णालय मध्ये दहा दुर्बल घटकासाठी राखीव ठेवण्यासाठी राज्य शासनाने समित्या गठीत केले आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे यांची निवड केली आहे. तर वेदकीय क्षेत्रातील डॉक्टर राजेश अग्रवाल डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर यांची निवड शासनाने केली आहे
सातत्याने आरोग्य सेवेमध्ये व आरोग्य सेवा चांगली व्हावी यासाठी आमदार सावरकर आमदार पिंपळे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच लेडी हार्डिंग मूर्तिजापूर तसेच ग्रामीण भागातील रुग्ण सेवा चांगली होण्यासाठी प्रयत्नशील असतात व सातत्याने मुंबई नागपूर पुणे येथे रुग्ण सेवा करण्यासाठी तत्पर राहतात व यासाठी वेगळी टीम सुद्धा तयार करण्यात आली आहे आता पुन्हा शासनाने त्यांच्याकडे ही जबाबदारी देऊन सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने जबाबदारी दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला या लोकप्रतिनिधींच्या सक्रिय त्याचा लाभ मिळणार आहे