कारंजा : शासनाने दिव्यांगाना अर्थ सहाय्य करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायत यांना करून, दिव्यांग अर्थ सहाय्य निधीची तरतूद सुद्धा केलेली आहे. परंतु सन 2020-21 आणि सन 2021-22 ह्या गेल्या दोन वर्षात कारंजा नगर पालिकेने दिव्यांगाना वाऱ्यावर सोडलेले असून, गेल्या दोन वर्षाच्या दिव्यांग सहाय्यता निधीचे वितरण केव्हा होणार ? ह्याकरीता दिव्यांग बांधव नगर पालिकेच्चा फेऱ्या मारीत असून त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेकडे प्राप्त होत असून, आता कारंजा नगर पालिकेने प्राधान्याने दिव्यांगाच्या अर्थसहाय्याची समस्या लवकरात लवकर सोडविण्याची गरज असल्याचे दिव्यांग बांधवाचे मत आहे .