विदर्भातील कोष्टी समाजामधील तरुण आणि युवतीला उद्योजक बनवणे, स्वयंरोजगार कसा निर्माण करता येईल या अनुषंगाने आज महाराष्ट्र शासन, उद्योग संचनालय, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, हिंगणा, नागपूर येथील कार्यालयास अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेच्या अध्यक्ष सतीश दाभाडे, विदर्भ कोष्टी हितकारणी मंडळाचे नागपूर चे अध्यक्ष गजाननराव धोपे, नागपूर येथीलच उद्योजक श्री विलासराव गोरख यांच्या समवेत भेट देण्यात आली.भेटीच्या वेळी उद्योजकता विकास केंद्राचे विदर्भ प्रमुख तथा केंद्रप्रमुख हेमंत वाघमारे यांचे सुरुवातीला अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या वतीने सतीश राव दाभाडे यांचे स्वागत करण्यात आले विदर्भातील होतकरू मुला-मुलींकरिता भविष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शिबिरे आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली छोटे मोठे व्यवसाय, उद्योग, निर्मिती व्यक्तिमत्व विकास, कर्ज घेण्याबाबतच्या विविध अडचणी, प्रकल्प तयार करण्याचे , विविध शासकीय योजना इत्यादी विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली सुरुवातीला विदर्भातील ज्या मुला मुलींना रोजगार, उद्योग, सुरू करण्याची तीव्र इच्छा आहे, जिद्द व चिकाटी आहे .अशा मुलांकरिता अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेच्या वतीने नागपूर या ठिकाणी ऑक्टोबर मधील दुसऱ्या आठवड्यामध्ये एक दिवसाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सदर कार्यशाळा हिंगणा एमआयडीसी, उद्योजकता विकास केंद्राच्या, प्रशिक्षण वर्गामध्ये घेण्यात येईल. कार्यशाळे मध्ये उद्योग केंद्राचे प्रमुख हेमंत वाघमारे हे स्वतः व. मा. कामगार आयुक्त कोष्टी समाजाचे राज्य अध्यक्ष सतीशराव दाभाडे सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत•• कार्यशाळेकरिता सहभागी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही सहभागी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून पुढील प्रशिक्षण देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल• विदर्भातील समाज बंधुंनो, आपल्या समाजाची आर्थिक स्थिती बघता यापुढे समाजामध्ये उद्योजक बनविणे हे. काळाची गरज आहे• अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषदेने ही गरज लक्षात घेऊन सुरुवातीला विदर्भामध्ये हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. समाजातील तरुण-तरुणीच्या प्रतिसादानुसार संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल• विदर्भातील प्रसिद्ध उद्योजक राजूभाऊ निवल, यवतमाळ, अशोकराव नागपुरे, अकोला, सुधीर अलोने, दारव्हा, विलास गोरख, रवी जुमळे, नागपूर, शिक्षण तज्ञ सुशील हिंगे सौ गीता ताई हिंगे, गडचिरोली, सौ लताताई प्रशांत उकंडे, अकोला, सहकार तज्ञ सौ शीलाताई निवल व यवतमाळ येथील तरुण उद्योजक ऋषिकेश निवल हे सदर उपक्रम राबविण्यासाठी परिषदेस सहकार्य करणार आहेच तर, समाज बंधुंनो, …समाजाला, समाजातील तरुणांना आत्मनिर्भर आणि समाजामध्ये उद्योजक तयार करण्याकरिता आपली नावे विलास गोरख, श्री गजानन धोपे, रवी जुमळे, यांच्याकडे 25 सप्टेंबर 2022 पर्यंत देण्यात यावी, सर्वांच्या प्रतिसादाशिवाय कार्यशाळेचे नियोजन प्रभावी करणे शक्य होणार नाही त्यामुळे कृपया त्वरित समाजाला सर्वांगीण दृष्ट्या प्रगत करण्याच्या अनुषंगाने आपली नावे द्यावीत आणि परिषदेला सहकार्य करण्याचे आव्हान पत्रका द्वारे करण्यात येते अशी माहिती शैलेश अलोने यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....