कारंजा (लाड) : विद्यार्थी दशेत भारतिय स्वातंत्र्याच्या काँग्रेसच्या अहिंसावादी लढ्याच्या प्रेरणेने वयाच्या सोळाव्या वर्षापासून काँग्रेसला जीवन अर्पण करणाऱ्या प्रदिप वानखडे यांनी काँग्रेसच्या प्रचार प्रसाराची कधीच कसर सोडली नाही. माजी खासदार गुलामनबी आझाद आणि तत्कालिन आमदार अनंतराव देशमुख यांना निवडून आणल्या नंतर त्यांचा प्रदेश काँग्रेसमध्ये रुतबा वाढला होता.त्यांना पक्षाची अनेक पद उपभोगण्याची संधी मिळाली. दोन वेळा नगरसेवक पदाची निवडणूक लढविणारे प्रदिप वानखडे योजना महर्षी बाबासाहेब धाबेकर यांचे पर्सनल असिस्टंट होते. कित्येका करीता ते किंगमेकर ठरले होते. खेर्डा काळी ग्रामपंचायतची निवडणूक लढविणाऱ्या प्रदिप वानखडे यांची सरपंच पदावर निवड होताच त्यांनी संधीचे सोने करून आपल्या ग्रामपंचायतीला कारंजा क्षेत्रातून महसूल मिळवून दिला. शिवाय दहा वर्ष ग्रामपंचायती मधील वाडे वस्तीला कारंजा शहराच्या हद्दवाढीपासून दूर ठेवून नागरीकांचे हित साधले. आज दुदैवाने काँग्रेसचे खच्चीकरण होऊनही प्रदिप वानखडे काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी पर्यंत त्यांना आगळाच मानसन्मान आहे. राजकारणाचा त्यांनी जनताजनार्दनाच्या हितासाठी सदुपयोग घेतला. स्वतःला नेहमीच स्वार्थ आणि भ्रष्टाचारापासून अलिप्त ठेवले. अशा 'मुर्ती लहान पण किर्ती महान' असणाऱ्या प्रदिप वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम त्यांच्या मित्रमंडळाने नुकताच श्री कामाक्षा देवी संस्थान सभागृहात माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया यांचे अध्यक्षतेखाली तथा काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ नेते अब्दुल राजिक शेख यांचे उपस्थितीत साजरा केला. यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया तथा अब्दुल राजिक शेख यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचलन व आभार संजय कडोळे यांनी मानले.कार्यक्रमाला गजानन चव्हाण, शाहीर देवमन मोरे,उमेश अनासाने, कैलास हांडे, रोहित महाजन आदींची उपस्थिती लाभली .