वाशिम : जिल्हयातील सर्व मान्यता प्राप्त खाजगी शैक्षणिक संस्थांनी पवित्र पोर्टल 2022 व्दारे खाजगी शैक्षणिक संस्थेच्या शाळांमधील रिक्त शिक्षक पदांची भरती प्रक्रीया सुरु आहे. ज्या संस्थांना पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांचे रिक्त पदे भरावयाची आहे. त्यांनी mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देवून शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व माहिती भरावी. पवित्र पोर्टलवर माहिती भरण्याचा अंतिम दिनांक 15 जानेवारी 2024 आहे. ही प्रक्रीया 16 ऑक्टोबर 2023 पासून सुरु झाली आहे. याबाबत काही अडचण असल्यास शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा माध्यमिक कार्यालय,जिल्हा परिषद, वाशिम येथे संपर्क करावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) राजेंद्र शिंदे यांनी कळविले आहे.