विविध विकास कामांसह बहु प्रतिक्षित शेत रस्त्यांची /ग्रामीण रस्त्यांची कामे मंजूर
मतदार संघातील १२५ कामांना प्रशासकीय मंजुरी
कारंजा :- कारंजा मानोरा विधान सभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे (लेखाशीर्ष २५१५ १२३८) या योजनेंतर्गत विकासकामांना मंजूरी देणेबाबत मतदार संघातील कामे सुचवली होती.या कामांना प्रशासकीय मंजुरात मिळाली असुन ५ कोटी रूपये अंदाजित किंमत असलेल्या मतदार संघातील १२५ कामांना मंजुरात मिळाली आहे.दिनांक : ३१ ऑक्टोबर, २०२३ रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे.शासन निर्णय क्र. विकास-२०२३/प्र.क्र.५७२(३०) / योजना-६ बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई- ४०० ००१ .शासन निर्णया नुसार राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत अनेक लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव शासनाकडे प्राप्त होत असतात. त्या अनुषंगाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसंदर्भात संदर्भाधिन क्र. २ ते ८ येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. सबब, सदर शासन निर्णयान्वये सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतूदीतून सोबत जोडलेल्या अनुसूचीप्रमाणे वाशिम जिल्हयातील विकासकामांसाठी एकूण रु. ५००.०० लक्ष ( अक्षरी पाचशे लक्ष फक्त ) इतक्या रकमेच्या कामांस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांना निधी वितरणासाठी LPRS (Liability Payment Register System) प्रणाली राबविण्याबाबत दिनांक ३१ मार्च, २०२२ च्या शासन परिपत्रकान्वये निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णयाच्या अनुषंगाने सदर मंजूर कामांचा निधी LPRS प्रणालीद्वारे वितरित करण्यात येईल. असे शासन निर्णयात नमूद आहे. मंजूर कामांची अनुसूची या प्रमाणे आहे.ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. विकास- २०२३/प्र.क्र.५७२(३०) / यो-६, दि.३१ ऑक्टोबर, २०२३ च्या आदेशासोबतची अनुसूची- २५१५ १२३८ अंतर्गत वाशिम जिल्हयातील (सा.बां.वि.) विकास कामांना मंजूरी देण्यात आली आहे. आ.राजेंद्र पाटणी यांनी प्रस्तावित केलेली कामे
खालील प्रमाणे आहे वढवी जगदंबा मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे.पलाना येथे गजानन महाराज मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे,काकड शिवणी शिवाजी महाराज पुतळा ते उमेश लके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे,अंतरखेड येथे स्मशानभूमी बांधकाम करणे,चाकूर नागनाथ मंदिर परिसरामध्ये सभामंडपाचे बांधकाम करणे,चिस्ताला येथे मधुरा समाजावर सामाजिक सभामंडप बांधकाम करणे,देऊरवाड़ी शंकर मंदिर ते हनुमान मंदिर नाली बांधकाम करणे,ढोणी बाबुराव महाराज संस्थान येथे सभामंडप बांधकाम करणे,खापरदरी हनुमान मंदिर परिसरामध्ये सभामंडप बांधकाम करणे,कोलार पाणी टाकीजवळ भगत यांच्या घराजवळ सभामंडप बांधकाम करणे,पंचाळा हनुमान मंदिर परिसरामध्ये सभामंडप बांधकाम करणे,पिंपळशेंडा मुंगसाजी महाराज मंदिर परिसर सभामंडप बांधकाम करणे,सोयजना महादेव मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे,विळेगाव अप्पास्वामी मंदिर परिसरात सभामंडप बांधकाम करणे,मोहगव्हाण ता. मानोरा येथे मुख्य रस्त्यापासून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रस्ता बांधकाम करणे,टाकळी खु. संजय निंघोट ते दत्ता निंघोट यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे,जामठी खु. ता. कारंजा येथे हनुमान मंदिर परिसरात सभामंडप करणे,पिंपळगाव गुंजाटे धोत्रे यांचे घर ते महंत महाराज चौक पर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे,शहा दिगंबर काटोले यांचे घर ते भवानी मंदिर पर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे,दापुरा मनोरा रस्ता ते विनोद शामसुंदर यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे,धानोरा भुसे येथे वडार समाजासाठी सभामंडप तयार करणे,सोमठाणा उमेश ढोरे यांच्या घरापासून ते विठ्ठल मंदिरपर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे, मानोर येथे अवधूत महाराज मंदिर परिसरात डोम सभामंडप तयार करणे,सोमनाथ नगर, हनुमान मंदिर परिसरात सभामंडप तयार करणे,गादेगाव मैंने खेत से निरंजन राखाड यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे,मांडवा कारला येथे वडडरपूरा परिसरात सभामंडपाचे बांधकाम करणे,मेंद्रा उत्तम गुलाब खडसे यांचे घर ते शिवा रमेश नांदे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे,वसंतनगर प्रवीण पवार यांच्या घरापासून ते प्रभू चव्हाण यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता तयार करणे,लोहारा ते धाकली ता. कारंजा येथे ग्रामीण रस्ता करणे,धामणी ते वाघोडा ता. कारंजा येथे ग्रामीण रस्ता करणे,पसरणी ते किन्ही ता. कारंजा येथे ग्रामीण रस्ता करणे,ब्राम्हणवाडा ते विरगव्हान ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,वालई ते शिवनगर ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,विरगव्हाण ते हिवरा ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे, पिंप्री वरघट ते येवता ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे, अंबोडा ते पिंपळगाव ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,धनंज बु. ते शिरसोली ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,भिवरी ते भामदेवी ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,
लोणी ते मोहगव्हान ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,कुरहाड से कामरगाव ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,हिंगणवाडी निमासवाडा ते धनज बु. ग्रामिण रस्ता रस्ता करणे,पारवा ते काजलेश्वर ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,भडशिवनी ते शहा ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे.बदलापुर ते मोझर ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,कुपटी ते शहा ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,जलापुर से मोझर ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,पिंपरी मोखड ते हनुमानवाडी ता. कारंजा येथे ग्रामिण रस्ता करणे,कामठवाडा ता. कारंजा येथे कामठवाडा ते येवता शेत रस्ता करणे,वडगाव रंगे से मनभा ता. कारंजा रस्ता बांधकाम करणे,वडगाव रंगे ते अडगाव भागीचा रस्ता करणे,वडगाव रंगे ते खरडगाव ता. कारंजा रस्ता बांधकाम करणे,अलीमर्दापुर येथे राजीव भेंडे ते गजानन खोडे पर्यंत रस्ता करणे,धानोरा ता. कारंजा येथे इंदू हागवणे ते भिमराव आडोळे यांचे शेतपर्यंत रस्ता बांधकाम करणे,यावर्डी ता. कारंजा येथे अरुण ठाकरे ने गुलाबराव ठाकरे रस्ता करणे,मनभा ता.कारंजा येथे नागाबाबा मंदिर ते अडगाव रस्ता करणे,मनभा ता.कारंजा येथे फेडरेशन से वडगाव पर्यंत रस्ता करणे,धानोरा ता.कारंजा येथे बापुराव सोनटक्के ते बापुराव कदम यांच्या शेतपर्यंत रस्ता बांधकाम करणे,सुकळी मनभा पिलखेडा ता.कारंजा रस्ता बांधकाम करणे, सुकळी पिलखेडा ता कारंजा रस्ता बांधकाम करणे,आखतवाडा ता. कारंजा आखतवाडा ते पिंप्री मोखड रस्ता करणे,झोडगा ता. कारंजा जगनाथ उमाळे ते योगेश लकडे रस्ता करणे,झोडगा ता. कारंजा अंबक काकड़ ते देवरावजी लसनकुटे पर्यंत रस्ता करणे,दुधोरा ता. कारंजा येथे दुधोरा ते पिंप्री रस्ता बांधकाम करणे,मनभा ता. कारंजा येथे मनभा ते ल दोनंद रस्ता बांधकाम करणे,जानोरी ता. कारंजा येथे पानगव्हाण रस्ता ते प्रकाश लुंगे शेतापर्यंत रस्ता करणे,पिंप्री मोडक से ब्राम्हणवाडा शेत रस्ता बांधकाम करणे,बेलखेड ते कुरहाड शेत रस्ता बांधकाम करणे,लाडेगाव ते नारेगाव शेत रस्ता बांधकाम करणे, धनज खुर्द ते शिरसोली शेत रस्ता बांधकाम करणे ,उंबर्डा ते जुना दुधौरा शेत रस्ता बांधकाम करणे,दिघी ते जनुना शेत रस्ता बांधकाम करणे,रामटेक ते वदुरा शेत रस्ता बांधकाम करणे, कामरगाव ते जुना कुपटी रस्ता बांधकाम करणे,माळेगाव ते धोत्रा जहाँ शेत रस्ता बांधकाम करणे,धामणी येथे प्रवीण धोटे यांच्या शेतापासून उत्तम ठाकरे यांच्या शेतापर्यंत रस्ता बांधकाम करणे,उत्तम ठाकरे यांच्या शेतापासून कोडोळीकडे जाणारा रस्ता करणे.कुपटा दारव्हा रोड ते सावरगाव फॉरेस्टकडे जाणारा रस्ता करणे,जनुना खु येथील खापरी शिवारातील वाडबभाई यांच्या शेतापासून रामू काजळे यांच्या शेतापर्यंत रस्ता बांधकाम करणे,चोंडी धामणगाव देव रस्ते पासून बंजारा खेड जाणारा रस्ता करणे, एकलारा भास्कर देशमुख यांच्या शेतापासून राहुल सुर्यवंशी यांच्या शेतापर्यंत रस्ता बांधकाम करणे,गुंडी सरस्वतीबाई धनगर यांच्या शेतापासून कैलास कांबळे यांच्या शेतापर्यंत रस्ता बांधकाम करणे,रोहाणा विजय देशमुख यांच्या शेतापासून ते सुभाष देशमुख यांच्या शेतापर्यंत रस्ता बांधकाम करणे,पोहरादेवी से भुलीकडे जाणारा रस्ता बांधकाम करणे,काकड चिखली ते सिंगत कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे,वाईगौळ जुनी वस्ती ते दिग्रस रोड कडे जाणारा रस्ता करणे,गोडेगांव ते उमरी बु.कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे,आमकिन्ही ते बळीराम नगर कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे,वसंतनगर ते भुली कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे,धावगंडा ते बालाजी नगर कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे,धावगंडा ते पोहरादेवी कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे,वाईगौळ ते मंडवा कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे, उमरी खुण ते विष्णुदास राठोड यांच्या शेतापर्यंतकडे जाणारा रस्ता करणे,पोहरादेवी बस स्थानक ते भुली कडे जाणारा रस्ता बांधकाम करणे, भुली ते माहुली रस्ता तयार करणे,भुली ते हातना रस्ता तयार करणे,भुली ते चाकूर रस्ता तयार करणे,भुली ते शिवणी रस्ता तयार करणे,फुलउमरी से सोमेश्वर नगर रस्ता तयार करणे,रंगपट्टी वसंतनगर मेन रस्ता तयार करणे,उमरी चुण ते गोंडेगाव मुख्य रस्ता तयार करणे,सामकी माता ते शिवमंगल टेकडी पर्यंत रस्ता तयार करणे,धानोरा तालुका कारजा उत्तमराव ताथोड ते गणेशपुर ग्रामीण रस्ता करणे,धानोरा तालुका कारंजा रामेश्वर वडेकर ते वसंतराव ग्रामीण रस्ता करणे,मनभा धानोरा पादन कुंबळे ते थोटागे ग्रामीण रस्ता तयार करणे,मनभा तालुका कारंजा मनभा लोणी ग्रामीण रस्ता तयार करणे, तारखेडा तालुका कारंजा तारखेडा ते मुंगुटपूर ग्रामीण रस्ता तयार करणे,दुघोरा तालुका कारंजा दुधोरा ते कारखेडा ग्रामीण रस्ता तयार करणे,पसरणी तालुका कारंजा पसरणी ते सोहळ ग्रामीण रस्ता तयार करणे,खेर्डा तालुका कारंजा खेर्डा जिरापुरे ते गणेशपूर ग्रामीण रस्ता तयार करणे,कुपटी तालुका कारंजा नीरज गोळे ते किरण धाने शेत ग्रामीण रस्ता करणे,गणेशपूर तालुका कारंजा गणेशपूर ते येवता ग्रामीण रस्ता तयार करणे, इंझा तालुका कारंजा येवता शिवाली ते उंबर्डा ग्रामीण रस्ता तयार करने,उंबर्डा ता. कारंजा पीलखेडा शिंदे शेत ते श्रीराव ग्रामीण रस्ता करणे, शेमलाई तालुका कारंजा पाचंगे यांच्या शेतापासून ते रत्नाबाई अंभोरे यांच्या शेतापर्यंत ग्रामीण रस्ता तयार करणे.नारेगाव ते मोहगव्हाण पर्यंत रस्ता तयार करणे, इंझोरी येथील एकनाथ लांडगे यांच्या शेतापासून ते विजय जयस्वाल यांच्या शेतापर्यंत रस्ता तयार करणे, जामदार येथील शामराव विरेकार ते विष्णु शेरे यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे,इंजोरी येथील विजय इंगोले यांच्या शेतापासून तर विजय शेंडगे यांच्या शेतापर्यंत रस्ता तयार करणे,दापुरा सुनिता विहिरे ते चंदुभाई श्यामसुंदर याच्या शेतापर्यंतचा रस्ता रस्ता करणे,भोयनी ते रुद्राला रस्ता तयार करणे,मोहगाव ते हट्टी रस्ता तयार करणे,अजनी धानोरा येथील रस्ता ते कैलास चिपडे यांच्या शेतापर्यंत रस्ता करणे,म्हसणी ते जामदरा शिवार पर्यंतचा रस्ता तयार करणे,उंबर्डा ते इंजोरी रस्ता तयार करणे तोरणाला ते चौसाळा रस्ता तयार करणे.वरील विकास कामांना प्रशासकीय मंजूरात मिळाली असुन मतदासंघातील 125 कामांकरीता अंदाजित एकूण रक्कम ५ कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....