कारंजा भाजपा युवा मोर्चा कडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्य व लोकमान्य टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्य आदरांजली अर्पण करण्यात आली..आज दुपारी
1: 00 वाजता पार पडलेल्या कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त स्थानिक स्टेट बॅक जवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रोहीत सम्रत व जैन प्रकोष्ठ चे जिल्हा संयोजक विनित गोलेच्छा यांच्या हस्ते हारार्पण व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कारंजा महीला मोर्चा अध्यक्षा व माजी नगराध्यक्षा सौ निशा गोलेच्छा यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर टीळक चौक येथे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांच्या प्रतिमेस
सौ .एकता गायकवाड यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले व पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी
जैन प्रकोष्ठ चे शहर संयोजक अमोल रुईवाले भाजपा आय टी सेलचे जिल्हा संयोजक जिग्नेश लोडाया , अमय डोणगावकर ध्रुव केसवाणी पप्पु चव्हान दिनेश डोईफोडे प्रतिक्षा देसाई साहील राठोड मनीष सम्रत सत्यम राऊत अथर्व चिपडे सुलभ साखरकर अतुल ढेरे सह परिसरातील व्यापारी बंधु पत्रकार गोपाल कडु संदीप कुऱ्हे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते