कारंजा [लाड] : जे सी हायस्कूल एन्ड ज्युनि कॉलेज कारंजाचा इयत्ता सहावीचा होतकरू व हुशार विद्यार्थी चि . हिमांशू हिम्मत मोहकर ह्याचा पुस्तक दिनाचे दिवशी वाढदिवस होता . त्यानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत, राष्ट्रिय सेवादल कॉग्रेसचे जिल्हा संघटक राजिक शेख . यांच्या अध्यक्षतेखाली घनश्याम भाऊ घाटे,विजयभाऊ खंडार , विशाल इंगळे,मनीष कानकीरड,गोपाल पोटे,मंगेश पिसे ,शरद पिसे, सूनील पिसे ,प्रमोद पीसे, योगेश भाऊ सातळे, हिम्मत मोहकर व संजय कडोळे तसेच वसूंधरा टिमच्या अध्यक्षा निताताई लांडे, सौ सोनाली पोटे, सौ पूजा इंगळे, सौ सूष्मा पिसे ,सौ जयश्री मोहकर, कु संजना मोहकर ,विद्यार्थी पार्थ कराळे, परीक्षीत पोटे ,आसीम शेख,शेख रेहान,आराध्य पिसे,स्वराज सातळे, कु .स्वरा पीसे इत्यादी विद्यार्थी मित्रमंडळीच्या उपस्थितीत पुस्तकांची भेट देऊन पुस्तकदिन साजरा केला .
यावेळी बोलतांना संजय कडोळे म्हणाले, "ज्ञानतृष्णा गुरौनिष्ठा सदाध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेन्छा विद्यार्थी गुण पन्चकम ॥" ह्या संस्कृत सुभाषितात सांगीतल्याप्रमाणे हिमांशू बेटा तू ज्ञान मिळविण्याची अभिलाषा, गुरुवरील श्रध्दा, जास्तीतजास्त अभ्यासाची प्रवृत्ती, एकाग्र होऊन अभ्यास व जीवनात काहीतरी होण्याचे ध्येय ऊराशी बाळगून पुस्तकालाच आपला मित्र, आपला मार्गदर्शक म्हणून अभ्यास कर . भारतरत्न डॉ बाबासाहेब यांनी आपले संपूर्ण जीवन आपला जास्तित जास्त वेळ पुस्तकांच्या वाचनात खर्ची घातला त्यामुळेच त्यांना आपल्या देशाचे संविधान लिहीता आले व त्या संविधानामुळे आपण आज प्रजासत्ताक जीवन गुण्यागोविंदाने जगत आहोत हे कायम लक्षात घे . व जीवनात मोठा विद्वान हो . हीच माझी आज पुस्तक दिनानिमित्त तुला हार्दिक शुभेच्छा आहे ." असे सांगितले .